अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीला सीबीआयकडून नोटीस
Breaking

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीला सीबीआयकडून अवैध कोळसा तस्करी घोटाळा प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजपाकडून सूडाच्या भावनेने ही कारवाई करण्यात येत, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसने दिली.

नवी दिल्ली - यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीला सीबीआयकडून अवैध कोळसा तस्करी घोटाळा प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. सीबीआयकडून रुजिरा बनर्जी यांना सीआरपीसी कलम 160 अंतर्गत नोटीस बजावली आहे. कोळसा तस्करी घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा नरूला उर्फ रुजिरा बनर्जी यांना सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची गरज नाही. त्यांची चौकशी घरातच करण्यात येणार असून त्यांचा जबाब नोंदवला जाईल, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पाच अधिकारी रुजिरा बनर्जी यांच्या दक्षिण कोलकातामधील घरी गेले होते. मात्र, यावेळी त्या घरात नव्हत्या. रुजिरा बनर्जी परतल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर सीबीआयशी संपर्क साधावा, असे अधिकाऱ्यांनी घरात उपस्थित असलेल्यांना सांगितले. तसेच सीबीआयने नोटीससह संपर्क साधण्यासाठी एक मोबाईल क्रमांकही दिला आहे.

तृणमूलची प्रतिक्रिया -

सीबीआयकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर तृणमूलने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाकडून सूडाच्या भावनेने कारवाई करण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मानहानीप्रकरणी समन्स बजवण्यात आल्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. रुजिरा बनर्जी यांना त्रास देण्यासाठी सीबीआयचा वापर करण्यात येत आहे, असे तृणमुल काँग्रेसचे प्रवक्ता कुणाल घोष म्हणाले.

अमित शाह यांना मानहानीप्रकरणी समन्स -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोलकातामधील एका विशेष न्यायालयाने समन्स जारी केले आहे. 22 फेब्रुवारीला वैयक्तीक किंवा वकिलामार्फत न्यायालयात दाखल व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. अभिषेक ब‌ॅनर्जी यांनी मानहानी प्रकरणी अमित शाह यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

अभिषेक बॅनर्जी कोण आहेत?

अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर आणि दक्षिण 24 परगणाचे प्रतिनिधीत्व करतात. पक्षात दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. 2011 मध्ये झाले राजकारणात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांचे भाऊ अमित बॅनर्जी यांचे ते पुत्र आहेत. तर काही दिवसांपूर्वी घराणेशाहीवरून मोदींना आव्हान दिलं होतं. केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन, असं अभिषेक यांनी म्हटलं होतं. तसेच माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले. तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईल, असंही म्हटलं होतं.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.