
रिंकू शर्मा हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या रिंकू शर्माची 10 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती.
नवी दिल्ली - दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या रिंकू शर्माची 10 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. रविवारी दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली. रिंकू शर्मा हा बजरंग दल आणि भाजपच्या युवा कार्यकर्ता होता.
दीन मोहम्मद (40), दिलशान (22), फैयाज (21) आणि फैजान (21) अशी आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकारी शर्मा यांनी सांगितले. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंदुत्ववादी संघटनांनी या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जय श्रीरामचा जयघोष केल्यामुळं त्याची हत्या झाली, असे रिंकू शर्माच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
काय घटना -
माहितीनुसार, रिंकू मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. पार्टीवरून घरी परतल्यानंतर दानिश, इस्लाम, मेहताब आणि जाहीद रिंकूच्या घराबाहेर येऊन शिवागाळ करू लागले. मनु आणि त्याचा भाऊ रिंकू याने त्यांना हटकल्यानंतर त्यांच्यातील वाद वाढला. त्यांच्याकडे शस्त्रे आणि काठ्या होत्या. इस्लामने रिंकूचा गळा पकडला. तर मेहताबने रिंकूवर चाकूने सपासप वार केले. यानंतर रिंकूला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाला.