कर्नाटकात जिलेटिन कांड्यांचा स्फोट, पाच ठार

कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात जिलेटिन कांड्यांचा भीषण स्फोट झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
बंगळुरू - कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा जिल्ह्यात जिलेटिन कांड्यांचा भीषण स्फोट झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हिरेंगावेली तालुक्यातील पेरिसंदरा पोलीस ठाणे क्षेत्रात आज(मंगळवार) रात्री हा अपघात झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही.