
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
- मुंबई - शहरात पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मोठ्याप्रमाणात छापेमारीचे सत्र सुरू आहे. शनिवारी डोंगरी पोलिसांनी सांताक्रूझ भागात मारलेल्या एका छाप्यात तब्बल साडेबारा कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी घाटकोपरमधील एका ड्रग्स पेडलरला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही छापेमारी करण्यात आली. दीपक बंगेरा असे त्याचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच लाख रुपये रोकडही हस्तगत केली आहे.
सविस्तर वाचा - सांताक्रूझमधून 12 कोटीचे अमली पदार्थ जप्त; मुंबईच्या डोंगरी पोलिसांची कारवाई
- मुंबई - देशात सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. एकीकडे पेट्रोलने शंभरी गाठली असतनाही केंद्र सरकारकडून या दरवाढीवर काँग्रेसच्या सत्ताकाळाकडे बोट दाखवत काँग्रेसलाच जबाबदार धरले जात आहे. राज्यातील विरोधक आणि सेलिब्रिटीदेखील देशद्रोहाच्या भीतीने या दरवाढीवर तोंडातून शब्द काढायला तयार नसल्याचा टोला लगावत शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सविस्तर वाचा - चंदा वसुलीपेक्षा इंधन दर कमी करून रामभक्तांच्या चुली पेटवा - शिवसेना
- अहमदनगर - नेवासा तालुक्यातील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील देवगड फाट्याजवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सची भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना सोमवारी (दि.२२) रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली. मिळालेली माहिती अशी आहे की, ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात होती. तर, स्विफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात होती.
सविस्तर वाचा - नगरच्या देवगड फाट्याजवळ स्विफ्ट कार आणि ट्रॅव्हल्सची भीषण धडक, पाच जणांचा मृत्यू
- मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकवर काढले आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागावे, कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि कोरोनाचा प्रसार रोखावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच येत्या आठ दिवसांत रुग्ण संख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. रविवारी राज्यातील जनतेशी त्यांनी संवाद साधला. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सविस्तर वाचा - लॉकडाऊनबाबत राज्यातील जनतेला आठ दिवसांचा अल्टीमेटम! - मुख्यमंत्री
- रायूपर - कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला होता. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. जगात कोरोना रुग्ण सक्रिय असलेल्या पहिल्या 15 देशांच्या यादीत भारताचाही क्रमांक आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 13 हजार 919 रुग्ण आढळले आहेत. तर 11 हजार 667 जण कोरोना मुक्त झाले असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा - कोरोना बळावतोय; भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..
- हैदराबाद - तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यातील नादिगुडेम गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन रेशीम शेतीचा हा प्रयोग यशस्वी केला आहे. रेशीम अळीचे प्रजनन ही नाजुक गोष्ट आहे. अळ्यांच्या खाद्यासाठी मोठ्या प्रमाणात तुतीच्या झाडांची लागवड करावी लागते. तुतीची लागवड करून अळ्यांची पैदास घेणे यापासून तर ते बाजारात विक्रीसाठी पाठवण्यापर्यंतची सर्व कामे नादिगुडेमच्या महिला करतात. त्यांच्या रेशीम शेतीला सरकारची मान्यता देखील मिळाली आहे.
सविस्तर वाचा - तेलंगणातील महिलांची सामूहिक 'रेशीम शेती'
- नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इंधन दरवाढीबाबत चींता व्यक्त केली आहे. पत्राद्वारे इंधन दरवाढ कमी करून मध्यम वर्गीय आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सविस्तर वाचा - इंधन दरवाढीवरून सोनिया गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
- यवतमाळ - कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला व्यक्ती पुन्हा पॉझिटिव्ह आला असेल तर त्याचे पूर्वीचे आणि आताचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेला पाठवा. जेणेकरून दोन्ही नमुन्यांमधील बदल लक्षात येईल. विषाणू पुन्हा आपले हातपाय पसरवित आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्प्रेडर’ मुळे कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रित करून संक्रमण रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी दिले.
सविस्तर वाचा - दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘एनआयव्ही’ला पाठवा - दीपक म्हैसेकर
- मुंबई - देशात इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीची फास्टॅग ही प्रणाली लागू झाली आहे. राज्यात एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) च्या काही टोलनाक्यांवर याची 100 टक्के अंमलबजावणी होण्यास अजून महिन्याभराचा काळ आहे. पण राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर याची 100 टक्के अंमलबजावणी सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी अधिकृत फास्टॅग असताना ही तो स्कॅन होत नसल्याने वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागत होता. पण आता मात्र या अडचणीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. कारण आता अधिकृत फास्टॅग स्कॅन न होणे ही तांत्रिक चूक मानत, वाहनचालकाला विना टोल जाऊ देण्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हा वाहनचालकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
सविस्तर वाचा - अधिकृत फास्टॅग स्कॅन न झाल्यास टोलमधून मिळणार सुटका
- बारामती - नागरिक नियम आणि शिस्त पाळत नाहीत. मुंबईच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोना वाढत आहे. याबाबत नागरिकांनी स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही वारंवार आवाहन करीत आहेत. पुन्हा लॉकडाऊन करायचा आहे का? असा सवाल शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच वाढत्या कोरोनाची संख्या ही सगळ्यांसाठीच चिंतेची बाब असून त्यावर राजकारण करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. खासदार राऊत इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सविस्तर वाचा - वाढती कोरोना संख्या सगळ्यांसाठीच चिंतेची बाब - संजय राऊत