
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
- पुणे- कोरोनाच्या काळात विवाह सोहळ्यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करणे माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांना महागात पडले आहे. त्यांच्यासह तीन जणांवर पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियम डावलणे पडले महागात! धनंजय महाडिक यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
- मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या परिस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा होतील असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे. आता दहावी-बारावीच्या परीक्षांबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत असून, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार नसल्याचे खुद्द शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी पालक आणि काही शिक्षण संघटनांनी केली होती, मात्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात बोर्डाचा विरोध होता. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना विचारले असता, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही, असे बोर्डाने म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून परीक्षांचा निर्णय घेऊ, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य नाही - वर्षा गायकवाड
- बीड - परळी तालुक्यातील टोकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केले, तसेच राजकीय कोट्या करत राजाची गोष्टही सांगितली. त्यानंतर भाषण संपताच आमदार संजय दौंड यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कडकडून मिठी मारली.
धनंजय मुंडेंनी सांगितलेल्या 'या' कथेने पिकला हशा; आमदार दौंड यांनी मुंडेंना मारली मिठी
- मुंबई - राज्यात कोरोना वाढत आहे. त्यातच राज्यातील अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या चार दिवसात पाच मंत्र्यांना कोरोनाने गाठले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली.
मंत्रालय कोरोना अपडेट : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
- मुंबई - सार्वजनिक कार्यक्रमांमधून, लग्न समारंभामधून, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्क घातले जात नसल्याने गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात राहावी, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पालिकेकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. सध्या पालिकेच्या अजेंड्यावर लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा विषय नाही. मात्र, पुढील काही दिवसात जर कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर रात्रीची संचारबंदी लावली जाऊ शकते, अशी शक्यता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली आहे.
....तर मुंबईत रात्रीची संचारबंदी लावली जाऊ शकते - पालिका प्रशासनाचे संकेत
- बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- गेल्या पाच सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने ५२,००० चा टप्पा ओलांडल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकात घसरण सुरू झालेली दिसून आली आहे.
पाच सत्रात शेअर बाजार निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण; ही आहेत चार कारणे
- नाशिक - मनपात तक्रारदारांची नावे सार्वजनिक होत असल्याने तक्रारदार पुढे येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कायद्यानुसार शासकीय कार्यालयात तक्रार घेऊन येणाऱ्यांची नावे गुप्त ठेवणे गरजेचे आहे, मात्र नाशिक महानगरपालिकेत असे होत नाही. त्यामुळे, अनेक नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे समजले आहे.
नाशिक मनपात तक्रारदारांची नावे सार्वजनिक होत असल्याने तक्रारदारांना मनस्ताप
- रायगड - जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण हे जास्त असले तरी शहरात फुटपाथ अपघात घटना घडलेल्या नाहीत. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील शहरातील स्थानिक प्रशासनाने नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथची सुविधा निर्माण केली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना गर्दीमध्ये जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
फुटपाथ सुविधांचा प्रशासनाला पडला विसर; पादचाऱ्यांना मनस्ताप
- मुंबई - कोरोनाचे आज कालच्या तुलनेत कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे आज 760 नवे रुग्ण तर 21 फेब्रुवारीला 921 रुग्ण आढळले आहेत. मुंबईने रुग्ण बरे होण्याचा 3 लाखांचा टप्पा आज ओलांडला आहे.
मुंबईत कोरोनाचे 760 नवे रुग्ण; 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे
- नवी दिल्ली - बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार यांना शनिवारी झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके ‘बेस्ट अॅक्टर’ पुरस्कार मिळाला.
दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार यांना बेस्ट अॅक्टरचा दादासाहेब फाळके पुरस्कार