पतीच्या मृत्यूनंतर काही तासातच पत्नीने सोडले प्राण

आजारी असलेल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका तासाच्या आतच पत्नीने प्राण सोडले. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील अकूनारायणपल्ली गावात एक दुःखद घटना घडली.
हैदराबाद - आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील अकूनारायणपल्ली गावात एक दुःखद घटना घडली. आजारी असलेल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका तासाच्या आतच पत्नीने प्राण सोडले. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
असीन भाशा आणि त्यांची पत्नी नान्नेमा हे अकूनारायणपल्ली गावात राहात होते. असीन यांचा दिर्घकालीन आजाराने मृत्यू झाला. नातेवाईक त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. मात्र, यातच दुसरी दुःखद घटना घडली. पतीचा मृत्यू झाल्यानंतर विरहाने शोकाकुल झालेल्या पत्नीचाही मृत्यू झाला.