
विदेशातील विविध कोरोना प्रकार आढळून येत आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज हैदराबादमध्ये दिली. युकेतील कोरोना प्रकारचे १८७, दक्षिण आफ्रिकेतील प्रकारचे ६ आणि ब्राझीलमधील प्रकारचा एक रुग्ण सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली - भारतात विदेशातील विविध कोरोना प्रकार आढळून येत आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज हैदराबादमध्ये दिली. युकेतील कोरोना प्रकारचे १८७, दक्षिण आफ्रिकेतील प्रकारचे ६ आणि ब्राझीलमधील प्रकारचा एक रुग्ण सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात दोन प्रकारचे कोरोना परावर्तित विषाणू
महाराष्ट्रात दोन प्रकारचे कोरोना परावर्तित विषाणू प्रकार आढळून आले आहेत. त्यांची 'एन४४०के' आणि 'ई४८४के' अशी नावे आहेत. या प्रकारचे विषाणू महाराष्ट्रासह केरळ, तेलंगणा राज्यातही सापडत आहेत. आम्हाला उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे हे दोन प्रकार दिसून येत आहेत. परंतु, महाराष्ट्र आणि केरळमध्ये काही ठिकाणी आपणास दिसून येणाऱ्या उद्रेकास हेच विषाणू प्रकार कारणीभूत आहेत, याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत, असेही पॉल म्हणाले.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात ६२१८ नवे बाधित रुग्ण सापडले असून ५१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ५८६९ रुग्ण आज कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णसंख्या वाढ हा चिंतेचा विषय असताना आज मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे.