कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींचा एल्गार, वायनाडमध्ये ट्रॅक्टर रॅली
राहुल

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे केरळ आणि तामिळनाडूच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते वायनाडमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी सभेला संबोधीत केले.

नवी दिल्ली - यंदा केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी हे केरळ आणि तामिळनाडूच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते वायनाडमध्ये पोहचले. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात त्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी राहुल गांधींनी स्व:ता ट्रॅक्टर चालवले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

राहुल गांधींची वायनाडमध्ये ट्रॅक्टर रॅली

शक्तीशाली लोकांना आणखी सशक्त करणे हे भाजपाचा विचार आहे. मात्र, काँग्रेस दुर्बलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनासोबत घेत जाण्यात आमचा विश्वास आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनरेगा योजनेची खिल्ली उडवली होती. मात्र, कोरोनाकाळात ही योजना लोकांसाठी वरदान ठरली. या योजनेसाठी त्यांना अर्थसंकल्पात तरतूद करावी लागली. युपीए काळात विकासाचे प्रमुख कारण म्हणजे मनरेगा. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत पैसा आला, असे राहुल गांधी म्हणाले.

देशातील शेतकरी अडचणींचा सामना करत असून हे संपूर्ण देश पाहत आहे. केंद्र सरकार शेतकऱयांचे दुख समजून घेत नाहीये. कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेती व्यवस्था उद्धवस्त करणे आणि हा व्यवसाय आपल्या दोन ते तीन मित्रांच्या हवाली करण्याचा मोदींचा उद्देश आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.