वैयक्तिक गोपनीयतेकरता जागतिक पातळीवर नियम व्हावेत- सत्या नाडेला
Satya

कोरोना महामारीमुळे जगभरात डिजीटल परिवर्तन घडत आहे. भविष्यात जगाने कुठे असायला हवे, हे मी पाहत आहे. ज्याप्रमाणे अन्न सुरक्षा, सुरक्षेचे कायदे आहेत, त्याचप्रमाणे डाटाचे नियमन करण्यासाठी नियम हवे आहेत वैयक्तिक गोपनीयता आणि सुरक्षेचे नियम जगभरात लागू व्हावे, असे मत सत्या नाडेला यांनी व्यक्त केले.

हैदराबाद - वैयक्तिक गोपनीयता हा मानवी हक्क आहे. सुरक्षा आणि डाटाबाबत गोपनीयतेसाठी जागतिक पातळीवर नियम लागू व्हावेत, असे मत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी व्यक्त केले. नाडेला हे तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग मंत्री के. टी. रामाराव यांच्याबरोबर ऑनलाईन बोलत होते.

वैयक्तिक गोपनीयता आणि सुरक्षेचे जगभरात नियमन झाल्यास तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवा सुरक्षेसाठी उपयुक्त होईल, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी म्हटले आहे. सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयतेबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सत्या नाडेला बोलत होते. पुढे नाडेला म्हणाले की, कोरोना महामारीमुळे जगभरात डिजीटल परिवर्तन घडत आहे. भविष्यात जगाने कुठे असायला हवे, हे मी पाहत आहे. ज्याप्रमाणे अन्न सुरक्षा, सुरक्षेचे कायदे आहेत, त्याचप्रमाणे डाटाचे नियमन करण्यासाठी नियम हवे आहेत वैयक्तिक गोपनीयता आणि सुरक्षेचे नियम जगभरात लागू व्हावे. त्यामुळे त्यांचे पालन करणे शक्य होईल.

हेही वाचा-धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल दरवाढीचे खापर फोडले जागतिक बाजारावर!

जनरल डाटा प्रोटेक्शन रेग्युलेशन्स (जीडीपीआर) हे नियम जगभरात पसरत आहेत. कंपन्यांनी गोपनीयता लक्षात घेऊन उत्पादने तयार करावीत, असेही सत्या नाडेला यांनी यावेळी सूचविले. यामधील निष्काळजीपणाची वृत्ती सहन करू नये, असे त्यांनी मत व्यक्त केले.

हेही वाचा-'५ जी'चे वेध; एअरटेलची क्वाकोम्नबरोबर संयुक्त भागीदारी

जीडीपीआर म्हणजे काय?

जीडीपीआर म्हणजे सामान्य डेटा संरक्षण नियमन आहे. युरोपच्या डिजिटल प्रायव्हसी कायद्याचा हा मुख्य भाग आहे. नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक डेटावर अधिक नियंत्रण मिळवून देण्यासाठी जीडीपीआर हे मार्गदर्शन करते. व्यवसायासाठी नियामक वातावरण सुलभ करणे उद्दीष्ट आहे. जेणेकरून युरोपियन युनियनमधील नागरिक आणि व्यवसाय दोघेही डिजिटल अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे फायदा घेऊ शकतात.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.