
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली.
मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आज सोमवारी 11,600 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दिष्टापेक्षा 88 टक्के म्हणजेच 10 हजार 556 लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 1 लाख 90 हजार 082 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 79 हजार 697 आरोग्य कर्मचारी तर 10 हजार 385 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज सोमवारी 33 लसीकरण केंद्रांवर 116 बूथवर 4500 आरोग्य कर्मचारी तर 7100 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 11,600 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 88 टक्के म्हणजेच 10 हजार 257 लसीकरण करण्यात आले. त्यातील 7 हजार 691 लाभार्थ्यांना पहिला तर 2566 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 4 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1 लाख 79 हजार 697 लाभार्थ्यांना पहिला तर 10 हजार 385 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 90 हजार 082 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत कामा हॉस्पिटल 1469, जसलोक हॉस्पिटल 162, एच एन रिलायंस 348, सैफी रुग्णालय 199, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल 166, कस्तुरबा हॉस्पिटल 4113, नायर हॉस्पिटल 22162, जेजे हॉस्पिटल 1422, केईएम 20463, सायन हॉस्पिटल 9401, हिंदुजा हॉस्पिटल 7, व्ही एन देसाई 2816, बिकेसी जंबो 19328, बांद्रा भाभा 6900, लिलावती हॉस्पिटल 19, सेव्हन हिल हॉस्पिटल 11659, कूपर हॉस्पिटल 11699, नानावटी हॉस्पिटल 68, कोकीलाबेन हॉस्पिटल 9, गोरेगाव नेस्को 6992, एस के पाटील 2306, एम डब्लू देसाई हॉस्पिटल 1339, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 16554, दहिसर जंबो 2855, भगवती हॉस्पिटल 1858, कुर्ला भाभा 1757, सॅनिटरी गोवंडी 3413, बीएआरसी 917, माँ हॉस्पिटल 3339, राजावाडी हॉस्पिटल 17230, एल. एच. हिरानंदानी 37, वीर सावरकर 2729, मुलुंड जंबो 5930, फोरटीस मुलुंड 31 अशा एकूण 1 लाख 79 हजार 697 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर दुसरा डोस म्हणून 10,385 अशा एकूण 1 लाख 90 हजार 082 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा- पोहरादेवी गर्दी प्रकरण : प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे