कलम १८८चे उल्लंघन करणाऱ्या ५७००० जणांवर गुन्हे दाखल
Cases

महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू असली तरी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबईत कारवाई सुरूच आहे. लॉकडाऊन दरम्यान देशाची आर्थिक राजधानी मुंबई तब्बल ५७५४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ८८७६ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई - कोरोणा संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता व त्यानंतर मुंबई शहरात हळूहळू अनलॉकच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. मात्र मुंबई पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई अजूनही सुरू आहे .

मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात अशी झाली कारवाई

२० मार्च २०२० ते २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान आतापर्यंत मुंबई शहरात २७७१५ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतून सर्वाधिक ६५०२ जणांवर कारवाई करण्यात आलेली असून , मध्य मुंबई २८९१ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पूर्व मुंबई ३७५२, पश्चिम मुंबईत ३८६२ , तर उत्तर मुंबईत सर्वाधिक १०७०८ जणांवर १८८ कलम नुसार नियमांचे उल्लंघन करण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे.

या प्रकरणात झाली आहे कारवाई

या कारवाई दरम्यान कोरोणा संदर्भात ३१७ गुन्हे , हॉटेल आस्थापन नियमापेक्षा अधिक वेळ चालू ठेवण्याच्या संदर्भात ३२३ गुन्हे, पान टपरीच्या संदर्भात १३५ गुन्हे , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यासंदर्भात १११७३ गुन्हे , अनधिकृत वाहतूक प्रकरणी ३०८८ गुन्हे , मास्क न वापरण्याच्या संदर्भात ११५०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबईत दाखल ५७५४० गुन्हे

लॉकडाऊन दरम्यान देशाची आर्थिक राजधानी मुंबई तब्बल ५७५४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ८८७६ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल २२७४५ आरोपींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडले असून २५८५३ आरोपींना पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडून दिले आहे.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.