
देशभरात पेट्रोलच्या दरांनी शंभरीच्या आकड्याशी जवळीक केली आहे. तर अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. महाराष्ट्रातही पेट्रोलने नव्वदी पार केली असून काही ठिकाणी स्पीड पेट्रोलच्या दरांनी शंभरीचा टप्पा ओलांडला आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशासह राज्यात आजही पेट्रोलच्या किमतीत काही अंशी कमी जास्त फरक दिसून आला आहे. देशभरातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. महाराष्ट्रातही पेट्रोलच्या दराने २ ते ३ रुपयांच्या फरकाने शंभरी गाठली आहे. तर काही जिल्ह्यात स्पीड पेट्रोलच्या किमतींनी शंभरी पार केली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर जाणून घेतले असता, आज(सोमवारी) औरंगाबाद जिल्ह्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर असल्याचे दिसून आले, औरंगाबाद जिल्ह्यात प्रति लिटरसाठी ग्राहकांना ९८.१६ रुपये मोजावे लागत आहेत. त्या खालोखाल जळगाव, हिंगोली आणि नंदुरूबार या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
इंधन दरवाढीवरून केंद्रातील सत्ताधारी भ्र शब्द उच्चारायला तयार नाहीत, तर ऊठसूट आंदोलन करणारा राज्यातील विरोधी पक्ष भाजपा देखील मूग गिळून बसला असल्याची टीका सत्ताधारी शिवसेनेने मुखपत्र सामना मधून केली आहे. तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्याने सर्वसामान्य जनतेला महाघाईची झळ सोसावी लागत असून इंधन दरवाढीवरून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
असे आहेत आज राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर-
औरंगाबाद
- पेट्रोल 98.16
- डिझेल - 89.23
जळगाव( आज कोणत्याही प्रकारची दरवाढ नाही)
- पेट्रोल 98.04
- डिझेल 87.73
- स्पीड पेट्रोल 100.88
हिंगोली (आज कोणत्याही प्रकारची दरवाढ नाही)
- पेट्रोल- 97.87
- स्पीड- 100.70
- डिझेल- 87. 59
नंदुरबार -(आज कोणत्याही प्रकारची दरवाढ नाही)
- पेट्रोल - 97.65
- स्पीड पेट्रोल - 100.48
- डिझेल - 87.39
नागपूर-
- पेट्रोल - 97.49 (१ पैसे वाढ)
- डिझेल - 88.60 (१ पैसे वाढ)
नाशिक
- पेट्रोल - 97.34
- डिझेल 87.05
कोल्हापूर -
- पेट्रोल - 97.23 (२१ पैसे घट)
- डिझेल - 86.97 (२१ पैसे घट)
चंद्रपूर-
- पेट्रोल - 97.19
- डिझेल - 87.00
मुंबई-
- पेट्रोल - 97.14
- डिझेल - 88.20
ठाणे-
- पेट्रोल - 97.11
- डिझेल - 88.18
रायगड-
- पेट्रोल - 97.05
- डिझेल - 86.76