
ओप्पो फाईंड एक्स ३ निओमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आहे. तर ४,५०० एमएएचची दणकट बॅटरी ही ६५ वॅटवर वेगाने चार्जिंग होते. तर स्मार्टफोनला ६.५५ इंचचा ९० हेगाहर्टझ ओएलईडी डिसप्ले आहे.
बीजिंग - चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो फाईंड एक्स ३ निओ लाँच करणार आहे. हा फोन ओप्पो रेनो ५ प्रो प्लस ५ जीच्या ब्रँडचे नुतनीकरण असल्याचे म्हटले जात आहे. हा ब्रँड चीनमध्ये डिसेंबर २०२० मध्ये लाँच करण्यात आला होता.
ओप्पो फाईंड एक्स ३ निओमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आहे. तर ४,५०० एमएएचची दणकट बॅटरी ही ६५ वॅटवर वेगाने चार्जिंग होते. तर स्मार्टफोनला ६.५५ इंचचा ९० हेगाहर्टझ ओएलईडी डिसप्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप असून ५० मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा आहे. तर १३ मेगापिक्सेलाचा टेलिफोटो, १६ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरणात भारताला प्राधान्य; संयम बाळगण्याचे सीरमकडून देशांना आवाहन
- ओप्पो फाईंड एक्स ३ निओ हा एप्रिलमध्ये एक्स ३ प्रो आणि एक्स ३ लाईटबरोबर लाँच होण्याची शक्यता आहे. फाईंड एक्स ३ प्रो हे पूर्णपणे नवीन डिव्हाईस आहे. इव्हान ब्लास याने ओप्पोच्या फाईंड एक्स ३ प्रोविषयी डिसेंबरमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
- फाईंड एक्स ३ प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोससर आणि ६.७ इंच १४४०पी डिस्पले आहे. तर डायनॅमिक रिफ्रेश रेट हा १२० एचझेड आहे. या स्मार्टफोनमध्ये ४,५०० एमएएचची बॅटरी आहे. ही बॅटरी ६५ वॅटवर वेगवान पद्धतीने चार्जिंग होते. इतकेच नव्हे तर वायलेस पद्धतीने ३० वॅटवर चार्जिंग होते.
- फाईंड एक्स ३ प्रोमध्ये ५० मेगापिक्सेल सेन्सर आहे. तर १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि २ x ऑप्टिकल झुम आणि ३ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे.
- फाईंड एक्स ३ लाईट हा ओप्पो रेनो०५ ५जीच्या ब्रँडचे नुतनीकरण आहे. त्यामध्ये ६.४३ इंच ९० एचझेड ओएलईडी डिस्पले आहे. तर ६४ मेगापिक्सेलचा वाईड कॅमेरा, ८ मेगापिक्सलेचा अल्ट्रावाईड आणि २ मेगापिक्सेला मॅक्रो आणि २ मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा आहे. त्यामध्ये स्नॅपड्रॅगन ७६५जी, त्यामध्ये ४,३०० एमएएच बॅटरी आहे. तर ही बॅटरी ६५ वॅटने वेगवान पद्धतीने चार्जिंग होते.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सलग दुसऱ्या दिवशी 'ब्रेक'