मनोरंजक :राजकुमार हिराणीच्या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू
Breaking

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या कारकिर्दीच्या निर्विवादपणे शिखरावर आहे. तिच्या हातामध्ये अनेक चित्रपट आहेत. तिच्या आगामी चित्रपटामध्ये आणखी एका मनोरंजक चित्रपटाची भर पडली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या आगामी चित्रपटात ती शाहरुख खानसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.

मुंबई - निर्माता राजकुमार हिराणी यांच्या आगामी शाहरुख खानसोबतच्या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूची निवड करण्यात आली आहे. हिराणी आणि एसआरके यांच्या एकत्र येण्याने हा चित्रपट आधीच चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट एक इमिग्रेशनवरील सोशल कॉमेडी आहे. पंजाबहून कॅनडाला जाऊन काम करणाऱ्या परप्रांतीयाच्या भूमिकेत सुपरस्टार शाहरुख खान असणार असल्याचे समजते.

या चित्रपटाबद्दलची ताजी चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाच्या नायिकेची. शाहरुख खानसोबत तापसी पन्नू रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिचा हा एसआरकेसोबतचा पहिलाच चित्रपट असेल.

दरम्यान, पन्नूने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी थ्रिलर 'दोबारा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 'दोबारा'ची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत कल्ट मुव्हीज आणि सुनीर खेतेरपालसह अथेना आणि गौरव बोस यांच्या 'व्हर्मिलियन वर्ल्ड प्रॉडक्शन'च्या वतीने केली जात आहे.

अभिनेत्री तापसी पन्नच्या हातामध्ये 'रश्मी रॉकेट', 'लूप लपेटा', 'हसीन दिलरुबा', 'दोबारा', 'शाबाश मिठू' आणि 'वो लाडकी है कहां'सारखे आगामी प्रकल्प आहेत.

हेही वाचा - वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दिशेने रवाना, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.