ENG Women vs NZ Women १st ODI : इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
Breaking

सलामी फलंदाज टॅमी ब्यूमोंट (७१) आणि कर्णधार हिथर नाइट (नाबाद ६७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव केला.

ख्राईस्टचर्च - सलामी फलंदाज टॅमी ब्यूमोंट (७१) आणि कर्णधार हिथर नाइट (नाबाद ६७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव केला. इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

  • Fifties from Tammy Beaumont and Heather Knight guide England to a comfortable eight-wicket win over New Zealand in the first ODI.#NZvENG pic.twitter.com/5PGJCaglV7

    — ICC (@ICC) February 23, 2021

न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामी फलंदाज हेली जेंसन ५३ आणि ब्रुक हालिडे याच्या ५० धावांच्या जोरावर ४५.१ षटकात १७८ धावांचे आव्हान उभारले. इंग्लंडकडून ताश फरांट आणि सोफी एकलेस्टोन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर कॅथरीन ब्रंट, फ्रेया डेविस, नताली स्कायवर, साराह ग्लेन आणि नाइट यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.

यजमान संघाने दिलेले हे आव्हान इंग्लंड संघाने ३३.४ षटकात आठ गडी राखून सहज पूर्ण केले. ब्यूमोंटने ८६ चेंडूत ११ चौकाराच्या मदतीने ७१ धावांची खेळी केली. तर नाइटने ६९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६७ धावांची खेळी साकारली. टॅमी ब्यूमोंट सामनावीर ठरली. उभय संघातील दुसरा एकदिवसीय सामना २६ फेब्रुवारीला होणार आहे.

हेही वाचा - राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचे उद्घाटन

हेही वाचा - Video : पुजाराच्या मुलीचा वाढदिवस; हार्दिक, रोहित, रहाणे यांच्या बच्चा पार्टीची धम्माल

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.