IND vs ENG: फिटनेस टेस्ट पास; उमेश यादवचा भारतीय संघात परतला
Breaking

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने फिटनेस चाचणी पास केली आहे. तो उर्वरित दोन कसोटीसाठी भारतीय संघात असणार आहे.

अहमदाबाद - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने फिटनेस चाचणी पास केली आहे. तो उर्वरित दोन कसोटीसाठी भारतीय संघात असणार आहे, याची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली.

  • NEWS: @y_umesh added to #TeamIndia squad for the last two @Paytm #INDvENG Tests.

    Details 👉 https://t.co/PO6nBt8JWu pic.twitter.com/Ek796rZ0Is

    — BCCI (@BCCI) February 22, 2021

उमेश यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्न कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यांचे मांसपेशी ताणले गेले होते. यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी उमेश यादवची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. पण, त्याआधी त्याला फिटनेस चाचणी अनिर्वाय करण्यात आली होती. उमेश यादवने ती फिटनेस चाचणी पास केली आहे. यामुळे त्याचा भारतीय संघात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

३३ वर्षीय उमेश यादवने ३३ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यात त्याने ३०.५४ च्या सरासरीने १४८ विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध उमेशने ७ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याच्या नावे १५ विकेट आहेत.

अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

हेही वाचा - IPL २०२१ : लिलाव संपल्यानंतर दोन मिनिटांनी विराटने केला 'या' खेळाडूला मॅसेज

हेही वाचा - कॉनवेची नाबाद ९९ धावांची खेळी पाहून अश्विन म्हणाला, 'तुला चार दिवस उशीर झाला'

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.