श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराला कोरोनाची लागण
sri

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याला कोरोनाची लागण झाली आहे.

कोलंबो - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याला कोरोनाची लागण झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आज (सोमवार) याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

माध्यमांच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. त्याआधी लाहिरुला कोरोनाची लागण झाली आहे.

एसएलसीने प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे की, 'लाहिरुची रविवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लाहिरू सरकारकडून कोरोनाबाबतीत तयार करण्यात आलेल्या प्रोटोकॉलचे पालन करत आहे.'

  • Following PCR Tests carried out on the squad nominated to take part in the ‘White Ball’ segment of the Tour of West Indies, Lahiru Kumara has tested Positive for Covid-19.
    READ: https://t.co/2JBIA6tBBf #SLC #LKA

    — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 22, 2021

दरम्यान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांच्यात ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे आयोजन ३ ते १४ मार्च यादरम्यान करण्यात आले आहे.

लाहिरू निर्धारित षटकांच्या मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही. पण तो २१ मार्चपासून सुरू होणाऱ्या उभय संघातील कसोटी मालिकेसाठी संघात दाखल होऊ शकतो.

हेही वाचा - बीसीसीआयचा धवनसह भारताच्या मर्यादित षटकांच्या खेळाडूंना आदेश!

हेही वाचा - हार्दिक, विराटपाठोपाठ टीम इंडियाचा अजून एक खेळाडू झाला 'बाबा'

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.