
धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका गुजराती गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. हा डान्स करताना ती संपूर्णपणे क्रिकेटच्या रंगात रंगली आहे. तिने व्हिडिओमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगचे हावभावही केले आहेत. तसेच ती 'अहमदाबाद तयार राहा' असे देखील यामधून सांगत आहे.
अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. हा सामना दिवस-रात्र पद्धतीने खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारताचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने एक डान्सचा व्हिडिओ शेअर करत अहमदाबाद तयार राहा, असे म्हटलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये झाले तर उर्वरीत दोन्ही सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. उभय संघातील मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. या मालिकेच्या निकालावरून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. यामुळे या मालिकेला महत्व आलं आहे. यादरम्यान, धनश्रीने एक मजेशीर डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.
धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका गुजराती गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. हा डान्स करताना ती संपूर्णपणे क्रिकेटच्या रंगात रंगली आहे. तिने व्हिडिओमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगचे हावभावही केले आहेत. तसेच ती 'अहमदाबाद तयार राहा' असे देखील यामधून सांगत आहे.
दरम्यान, धनश्रीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. धनश्री ही एक यूट्यूबर असून डान्सर व कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची कंपनीही आहे. तिने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चहलसोबत लग्न केले आहे.
हेही वाचा - आयपीएलमुळे आगामी कसोटी मालिकेच्या तयारीवर परिणाम नाही : पुजारा
हेही वाचा - आयपीएल लिलाव: आरसीबीने खरेदी केलेल्या खेळाडूंवर विराटने व्यक्त केलं समाधान