मोहम्मद अझरुद्दीन सनरायजर्स हैदराबाद संघावर नाराज, वाचा कारण
Breaking

सनरायजर्स हैदराबाद संघात २५ खेळाडू असून एकही खेळाडू हैदराबादचा नसल्याचे अझरुद्दीन नाराज आहे. यासंबंधी त्याने ट्विटही केले आहे. १८ फेब्रुवारीला पार पडलेल्या मिनी लिलावात हैदराबादने केदार जाधव, जगदीश सुचित आणि मुजीब उर रेहमान यांना संघात घेतले आहे.

हैदराबाद - चेन्नईमध्ये यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला. यात सर्व फ्रेंचायझींनी युवा-अनुभवी खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले. मात्र, सनरायजर्स हैदराबादने केवळ तीन खेळाडूंवर बोली लावली. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन या संघावर खूप नाराज आहे.

मात्र, अझरच्या नाराजीचे कारण वेगळे आहे. या संघात २५ खेळाडू असून एकही खेळाडू हैदराबादचा नसल्याचे अझरुद्दीन नाराज आहे. यासंबंधी त्याने ट्विटही केले आहे. १८ फेब्रुवारीला पार पडलेल्या मिनी लिलावात हैदराबादने केदार जाधव, जगदीश सुचित आणि मुजीब उर रेहमान यांना संघात घेतले आहे.

हेही वाचा - हार्दिक, विराटपाठोपाठ टीम इंडियाचा अजून एक खेळाडू झाला 'बाबा'

लिलावापूर्वी संघाने पृथ्वीराज याराला रिलिज केले होते, त्यानंतर आता त्याच्याकडे हैदराबादचा एकही खेळाडू शिल्लक नाही. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसवर तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. तर, अनकॅप्ड कृष्णप्पा गौतम यंदा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने तब्बल ९ कोटी २५ लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतले.

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सर्व संघांनी सुरुवात केली आहे. यामध्ये १६४ भारतीय, तर १२५ विदेशी खेळाडूंसह तीन असोसिएट खेळाडूंवर बोली लागली. यंदाच्या या लिलावात दरवर्षीप्रमाणेच परदेशी खेळाडूंना मोठा भाव मिळाला. तसेच काही भारतीय खेळाडूंवर देखील मोठी बोली लागली.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.