सिंगापूर ओपन : रामकुमार रामनाथन पहिल्याच फेरीत पराभूत
indias

भारताचा पुरूष टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावला लागला.

सिंगापूर - भारताचा पुरूष टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावला लागला. अमेरिकेच्या टारो डेनियलने रामनाथन याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.

डेनियलने जागतिक क्रमवारीत २००व्या स्थानी असलेल्या रामनाथनचा दोन तास सहा मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-३, ७-६, ६-३ अशा फरकाने पराभव केला.

पहिला सेट ६-३ ने गमावल्यानंतर रामनाथनने दुसऱ्या सेटमध्ये डेनियलला कडवी झुंज दिली. हा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतर यात डेनियलने बाजी मारली.

रामनाथन याचा डेनियलविरुद्धचा हा दुसरा पराभव आहे. याआधी २०१२ च्या आयटीएफ फ्युचर्स स्पर्धेत डेनियलने रामनाथनचा पराभव केला होता.

रामनाथनने पुरूष दुहेरीत पुरव राजासोबत जोडी जमवली आहे. या जोडीचा सामना कोरियाच्या एस. केवोन आणि जपानच्या के वाय युचियामा या जोडीशी होणार आहे.

रोहन बोपन्ना, जीवन नेदुचिझियन आणि एन. श्रीराम बालाजी यांनी देखील या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पण युकी भांबरीच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा आहेत. कारण दोन वर्षाच्या ब्रेकनंतर भांबरी टेनिस कोर्टवर परतणार आहे.

हेही वाचा - मेलबर्न पार्कचा राजा - नोवाक जोकोव्हिच

हेही वाचा - ऑस्ट्रेलियात 'जोकोव्हिच'ची सत्ता, नवव्यांदा जिंकली स्पर्धा

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.