नगरच्या देवगड फाट्याजवळ स्विफ्ट कार आणि ट्रॅव्हल्सची भीषण धडक, पाच जणांचा मृत्यू
ahmednagar

स्विफ्ट कारमधील जखमींना जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले. परंतु सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. यातील सर्वजण हे जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते.

अहमदनगर - नेवासा तालुक्यातील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील देवगड फाट्याजवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सची भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना सोमवारी (दि.२२) रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली. मिळालेली माहिती अशी आहे की, ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात होती. तर, स्विफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात होती.

स्विफ्ट कारमधील जखमींना जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले. परंतु सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. यातील सर्वजण हे जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. अपघाताची माहिती समजताच नेवासा पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक अशोक नागरगोजे, पोलीस नाईक बबन तमनर, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले. पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहेत.

हेही वाचा - बीसीसीआयचा धवनसह भारताच्या मर्यादित षटकांच्या खेळाडूंना आदेश!

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.