आमदार निलेश लंकेंचे राष्ट्रवादीतील वजन वाढले; जिल्हा बँक निवडणुकीत पार पाडली महत्त्वाची भूमिका
Breaking

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक सेवा सोसायटी आणि बिगरशेती मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. त्यात निवडून आलेले दोन्ही उमेदवार पारनेर तालुक्यातील आहेत. हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यात पारनेरचे आमदार निलेश लंके यांची महत्त्वाची भूमिका आहे.

अहमदनगर - एक सामान्य कार्यकर्ता, सरपंच ते आमदार अशी ओळख निर्माण करून निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यात आपले वर्चस्व निर्माण केले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचा पक्षात दबदबा वाढला आहे. पारनेर या आपल्या विधानसभा क्षेत्रातून जिल्हा बँक सेवा सोसायटी आणि बिगरशेती मतदारसंघातून मोठी राजकीय जुळवाजुळव करत त्यांनी दोन्ही उमेदवार निवडून आणले. जिल्ह्यात व्यवस्थित राजकीय 'फिल्डिंग' लावत त्यांनी प्रशांत गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. एकाच तालुक्यातून राष्ट्रवादीचे दोन संचालक निवडून आणल्याने आमदार लंके यांचा राष्ट्रवादीत दबदबा वाढला आहे.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे लंकेंच्या पाठीशी -

आमदार लंके राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित होते. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी पारनेरचे त्यावेळचे शिवसेना आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. उद्धव ठाकरे यांच्या सभेत लंके समर्थकांनी औटी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरेंनी निलेश लंके यांना शिवसेनेतून बाहेर काढले. त्यानंतर लंकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकरून २०१९ विधानसभा निवडणुकीचा चंग बांधला. त्यांनी पारनेर-नगर तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. गावागावातील युवावर्गाला लंके यांनी आपल्याकडे आकर्षीत केले. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवले. त्यांच्या संघटन कौशल्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दाद दिली. त्यानंतर अजित पवार यांनीही निलेश लंकेंचा करिश्मा ओळखत त्यांना पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली.

विजय औंटींचा केला पराभव -

राज्यात लक्षवेधी असलेल्या प्रमुख लढतीत पारनेरची लढत होती. या ठिकाणी विजय औटी हे शिवसेनेकडून सलग तीनदा निवडूण आलेले होते आणि विधानसभेचे उपाध्यक्षही होते. मात्र, मतदारांनी निलेश लंकेंना जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून दिले. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या वर्तुळात लंकेचे नाव चर्चेत आले. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या दोन्ही उमेदवारांसाठी स्वतः लक्ष घालून मीच उमेदवार असे समजून काम करण्याचे आवाहन लंकेंना केले. त्यासाठी त्यांनी नगरचे राष्ट्रवादीचे पितापुत्र अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांचे उमेदवार नाकारले. लंके यांनी सर्व ताकद पणाला लावून दोन्ही उमेदवार निवडून आणल्याने साहजिकच त्यांचे पक्षात वजन वाढले.

अहमदनगर जिल्ह्यात बारापैकी सहा आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे -

जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी सहा आमदार एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे. यावरून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते. निलेश लंके यांच्या मागे कसलाही राजकीय वारसा नसताना, हंगा या खेड्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या लंकेंनी आमदारकीपर्यंत मजल मारल्याने त्यांचे यश वरीष्ठ नेत्यांना भावले आहे.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.