पकडले डिझेल चोरीत, उलगडा झाला २३ लाखांच्या टायर चोरीचा!
Breaking

चिते पिंपळगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या डिझेल चोरी संदर्भात पोलिसांनी एका टोळीला अटक केले. या आरोपींची चौकशी करत असताना अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

औरंगाबाद - ग्रामीण पोलिसांनी एका आंतरराज्य डिझेल चोरांच्या टोळीला अटक केले आहे. त्यांची चौकशी केली असता सप्टेंबर 2020 मधील आणखी एका गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. सप्टेंबर 2020मध्ये याच टोळीने जळगाव जिल्ह्यात टायरचे शोरूम फोडून तेवीस लाख रुपयांचे टायर चोरी केले होते. अटक केलेल्या बारा जणांच्या टोळीला पोलीस कोठडी मिळाली होती, त्यावेळी त्यांनी कबुली दिली.

स्वस्त दरात करत होते टायर विक्री -

महाराष्ट्रातून सोयाबीन गुजरातला घेऊन जाणे आणि येताना तापी नदीतून वाळू विक्रीसाठी आणणे, असा व्यवसाय ही टोळी करत होती. मात्र, हा व्यवसाय करत असताना रस्त्यात अनेक ठिकाणी चोरी करण्याचे देखील काम ही टोळी करत होती. असाच प्रवास करत असताना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टायरचे शोरूम या टोळीने फोडले होते. तिथून त्यांनी तब्बल 23 लाख रुपयांचे टायर लंपास केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते या टायरर्सची कमी किंमतीत विक्री करत होते. स्वतः जवळ असलेल्या ट्रकचे देखील टायर त्यांनी बदलून घेतले होते, अशी माहिती या टोळीतील आरोपींनी पोलिसांना दिली.

ग्रामीण पोलिसांनी केले होते बारा जणांना अटक -

औरंगाबाद बीड महामार्गावर असणाऱ्या चिते पिंपळगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेलची चोरी झाली होती. या चोरीचा तपास करत असताना औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने बारा जणांना अटक केली होती. यामुळे डिझेल चोरीसह अन्य गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. अटकेत असलेल्या आरोपींनी मागील वर्षभरात 36 गुन्हे केले आहेत. याबाबत अधिक तपास चिखलठाणा पोलीस करत असून नवीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.