
संत एकनाथ महाराज मंदिराच्या आतील व बाहेरील परिसर हे पूर्णतः खुले ठेवता येणार नाही. याबाबत संत एकनाथ मंदिर विश्वस्त मंडळाला लेखी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. भाविकांनी दर्शनासाठी कमीत कमी प्रमाणात मंदिरात यायचे आहे.
औरंगाबाद (पैठण) - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात येत आहेत. मात्र नित्यनेमाने होणारे विधी सुरु राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, त्यानंतर लॉकडाऊन लागणार कि नाही हे आठ दिवसांनी रुग्ण संख्येवरुन ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी साांगितले.
संत एकनाथ मंदिर पूर्णतः खुले न ठेवण्याच्या सूचना
या पार्श्वभूमीवर पैठण तहसील प्रशासनाने उपविभागीय अधिकारी अनमोल सागर यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संत एकनाथ महाराज मंदिराच्या आतील व बाहेरील परिसर हे पूर्णतः खूले ठेवता येणार नाही. याबाबत संत एकनाथ मंदिर विश्वस्त मंडळाला लेखी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. भाविकांनी दर्शनासाठी कमीत कमी प्रमाणात मंदिरात यायचे आहे. दर्शनासाठी येताना मास्कचा वापर अनिवार्य आहे तसेत इतर खबरदारी घेण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. पैठण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त नियमांचे पालन करण्याचे आवाहन चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
हेही वाचा - खळबळजनक! दादरा व नगर-हवेलीचे खासदार मोहन देलकर यांची आत्महत्या?