पेट्रोल-डिझेल भरताना आता फसवणूक होणार नाही ; वजनमापे विभागाची नवी यंत्रणा जारी
पेट्रोल-डिझेल

वजनमापे नियंत्रण विभागांतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा येतो. एकूण आठ विभागात याची विभागणी केली आहे. ज्यामध्ये चंद्रपूर, वरोरा, राजुरा, मूल, नागभीड़, गडचिरोली, आरमोरी, अहेरी यांचा समावेश होतो. चंद्रपूर जिल्ह्यात १३० तर गडचिरोली जिल्ह्यात ३७ पेट्रोलपंप आहेत. म्हणजे एका पेट्रोलपंपामध्ये इंधन भरणाऱ्या किती नळ्या आहेत त्यानुसार याची तपासणी केली जाते.

चंद्रपूर : पेट्रोल-डीझल भरताना अनेक ठिकाणी बदमाशी केली जात असल्याचा घटना समोर येत असतात. मात्र, आता त्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. कारण यावर आधारित यंत्रणेने आता अनेक मोठे बदल केले असून पेट्रोल डिझेल भरताना फसवणूक करण्याची शक्यता जवळपास शुन्यच्या घरात आहे. या वर्षभरात वजनमापे नियंत्रण विभागाने केलेल्या तपासणीत एकाही पेट्रोलपंपावर अशाप्रकारचा फेरफार होण्याची बाब निदर्शनास आली नाही. भविष्यात ही यंत्रणा आणखी पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात ही यंत्रणा आणखी मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

पेट्रोल-डिझेल भरताना आता फसवणूक होणार नाही
अशी केली जाते पेट्रोलपंपांची तपासणीवजनमापे नियंत्रण विभागांतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा येतो. एकूण आठ विभागात याची विभागणी केली आहे. ज्यामध्ये चंद्रपूर, वरोरा, राजुरा, मूल, नागभीड़, गडचिरोली, आरमोरी, अहेरी यांचा समावेश होतो. चंद्रपूर जिल्ह्यात १३० तर गडचिरोली जिल्ह्यात ३७ पेट्रोलपंप आहेत. म्हणजे एका पेट्रोलपंपामध्ये इंधन भरणाऱ्या किती नळ्या आहेत, त्यानुसार याची तपासणी केली जाते. त्याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १ हजार १५७ नोझल आहेत. प्रत्येक नोझलच्या तपासणीसाठी पाच हजार रुपये इतके चालन आकारले जाते. या तपासणीला स्टॅम्पिंग असे म्हटले जाते. यामध्ये वजन मापे निरीक्षक पेट्रोलपंपाला भेट देतो. त्याच्याकडे पाच लिटरचे प्रमाणित माप असते. यात पेट्रोल-डीझल नोझलमधून टाकले जाते. ते योग्य असल्यास वजनमापे नियंत्रण विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र एक वर्षापर्यंत मर्यादित असते. हा काळ पूर्ण झाला की पेट्रोलपंप मालकाला पून्हा एकदा याची तपासणी करून घ्यावी लागते. अशी असणार नवी यंत्रणासध्याच्या नव्या यंत्रणेनुसार पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये असणारे अनेक उपकरणे हे 'युज अँड थ्रो' तत्वावर काम करतात. त्यात काही बिघाड आल्यास ती थेट बदलावावी लागतात. त्यामुळे त्यात बदमाशी करण्यास काहीही वाव नसतो. मात्र, आता यापुढे ह्यापेक्षाही ही यंत्रणा अद्यावत होणार आहे. १२ फेब्रुवारीला या संदर्भात राज्य शासनाच्या वजन मापे नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्याची तयारी आता सुरू झाली आहे. त्यानुसार पेट्रोलपंपात अनेक ठिकाणी सील लावण्यात आलेले असतात. ह्या सर्व ठिकाणी पारदर्शक अनावरण लावण्यात येणार आहेत. जेणेकरून सामान्य ग्राहक हे सर्व सील व्यवस्थित आहेत काय याची सहज पाहणी करू शकेल. या संबंधात सर्व ऑइल कंपन्या आणि पेट्रोलपंपाचे उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या मशीनमध्ये काही बिघाड आल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी येणारा कर्मचारी हा मशीन निर्माता कंपनीचा अधिकृत कर्मचारी आहे की नाही, त्याची पगार पावती बघण्याचा अधिकार पेट्रोलपंप मालकाचा असणारा आहे. तसेच यावेळी इंधन कंपनीचा प्रतिनिधी देखील असणार आहे. यानंतरच त्या पंपाची दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे ग्राहक आणि पेट्रोलपंप यंत्रणा यांच्यात विश्वास निर्माण होण्यास मदत होईल.
    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.