
यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान या ठिकाणी मराठी माघ महिन्यात १३ फेब्रुवारी ते माघ पौर्णिमा २७ फेब्रुवारीपर्यंतचे यात्रा उत्सव सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशावरून नियमांच्या अधिन राहून यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव - यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान या ठिकाणी मराठी माघ महिन्यात १३ फेब्रुवारी ते माघ पौर्णिमा २७ फेब्रुवारीपर्यंतचे यात्रा उत्सव सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशावरून नियमांच्या अधिन राहून यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आदेश डावलून नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' योजना ठरत आहे दिवास्वप्न
यात्रेत सर्व नियमांचे उल्लघंन
राज्यात प्रसिद्ध असलेली अट्रावल यात्रा ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून नियमांच्या अधिन राहून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंजोबा देवस्थान समस्त कोळी पंचकमेटी अट्रावलच्या वतीने सर्व भाविकांनी देवस्थानावर नवस फेडण्यासाठी येताना फक्त १० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. पंच कमेटीने भाविकांना इतर दिवशीही देवस्थानाचे दर्शन घेता येईल, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या प्राप्त झालेल्या सूचनांचे पालन करून देव दर्शनासाठी यावे, असे आवाहन केले आहे. मात्र, देव दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.
भाविकांनी नियमांचे पालन करावे
दर्शनासाठी भाविकांनी कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंजोबा देवस्थान विश्ववस्ताच्या वतीने अध्यक्ष ललित किटकुल कोळी, दिपक तायडे, प्रभाकर कोळी, अनिल कोळी, जनार्दन कोळी, विक्रम कोळी, जगन कोळी आणि पोलीस पाटील पवन चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - नवरदेवासह कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याने वऱ्हाडाची उडाली झोप!