भोकरदन-जालना रस्त्यावर भरधाव ट्रकचा अपघात; एक ठार, दोन जखमी
Breaking

भोकरदन-जालना रस्त्यावर एका ट्रकचा अपघात होवून एक ठार तर दोघे जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

जालना : भोकरदन-जालना रस्त्यावर बामखेडा जवळ एका ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये क्लिनर जागीच ठार झाला तर, चालक व दुसरा क्लिनर जखमी झाले. २० फेब्रुवारीला रात्री ही घटना घडली.

एक भरधाव ट्रक जालन्याहून भोकरदनकडे येत होता. रस्त्यावर असलेला खड्डा चुकवताना ट्रक चालकाने हलगर्जीपणा केल्यामुळे ट्रक पुलाला जावून आदळला. या अपघातामध्ये मनीष दिनेश बडोले (वय २५, रा. हरणगाव तालुका अंजेड, जिल्हा बडवानी एम पी), हा क्लिनर ठार झाला. तर, ट्रक चालक महेश गंगाराम बडोले, (वय ३५ रा. जलवानिया ता. अंजेड) व क्लिनर निशिल नयन सोळंकी (वय १७ रा. बालसमध ता. राजपूर, जि. बडवानी) हे दोघे पायाला व कंबरेला मार लागल्याने जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीस जमादार मिलिंद सुरडकर हे करत आहेत.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.