
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर वाढत असल्याने सर्व दौरे रद्द करत असल्याचे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
जालना - मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सरकारला आपण ठाम भूमिका मांडण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती संभाजी राजे छत्रपती यांनी दिली. त्यांनी महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर वाढत असल्याने सर्व दौरे रद्द केले असल्याचे सांगितले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
साष्ट पिंपळगाव ला भेट -
22 दिवसापासून अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला संभाजी राजे यांनी भेट दिली. त्यानंतर ते आज जालन्यात आले होते. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे, आणि आपल्या मुळे गर्दी होऊ नये म्हणून माझी एक सामाजिक बांधिलकी आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे पुढील सर्व दौरे मी रद्द केले आहेत असेही त्यांनी सांगितले.
प्रकरण न्यायप्रविष्ट -
साष्ट पिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलकांसोबत आपण आहोत, प्रत्येकाचे आंदोलन वेगवेगळे असते, त्यांचे मार्गही वेगळे असतात. मात्र, या आंदोलनाचा निकाल 8 मार्चला लागणार आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जास्त बोलता येणार नाही. मात्र, आपण आंदोलकांसोबत आहोत, आणि त्यांच्या भावना ही समजू शकतो. ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्यामुळे मला दुःख ही झाले आहे, असे सांगून महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणाची बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी सूचना केल्या असल्याचेही ते म्हणाले.