
कोल्हापुरातून अहमदाबादसह राजकोट, सुरतला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये कापड व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेचा सर्वांना फायदा होणार आहे.
कोल्हापूर - येथून कोल्हापुर-अहमदाबाद विमानसेवेची प्रतिक्षा आता अखेर संपली आहे. कारण दक्षिण महाराष्ट्रातील तिरूपती, बंगळूरू, हैदराबाद तसेच मुंबईनंतर आता अहमदाबादलाही कोल्हापूरातून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आज या मार्गावरील पहिले विमान कोल्हापूर विमानतळावर उतरले. यावेळी वॉटर सॅल्युट देऊन या विमानाचे स्वागत करण्यात आले. आजच्या पहिल्याच दिवशी 69 प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला. याच्या स्वागताला खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील विमानतळ प्रशासनाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
अनेकांना या विमानसेवेचा होणार फायदा -
कोल्हापुरातून अहमदाबादसह राजकोट, सुरतला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये कापड व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेचा सर्वांना फायदा होणार आहे. आज पहिल्याच दिवशी 69 इतक्या प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला.
हेही वाचा - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सलग दुसऱ्या दिवशी 'ब्रेक'
अशी असणार वेळ -
अहमदाबादहुन कोल्हापूरकडे सकाळी 8:30 वाजता निघेल तर कोल्हापूरात 10:15 ला पोहोचेल. तेच विमान कोल्हापुरातून सकाळी 10:45 सुटेल आणि अहमदाबादमध्ये 12:30 च्या आसपास पोहोचेल. आठवड्यातील केवळ 3 दिवस म्हणजेच सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही विमानसेवा असणार आहे.
जिल्ह्याला देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडण्याकरीता प्रयत्नशील -
यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या कोल्हापूरला जिल्ह्याला देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडण्याकरीता अद्ययावत 'कोल्हापूर विमानतळ' उभे करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील विविध कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. यामध्ये विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग कामे, धावपट्टी विस्तारीकरण अशा विविध काम प्रगतीपथावर आहेत. लवकरच ही सर्व कामे पूर्ण करून कोल्हापूरकरांसाठी एक अद्ययावत विमानतळ उभे करू, असे त्यांनी सांगितले. तर यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचेही यावेळी ते म्हणाले.