
६ जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाला यंदा जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या उत्तराखंडमधील तुंगनाथ या महादेव मंदिरातून जल आणले जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर हायकर्सची १९ जणांची टीम आज रवाना झाली आहे.
कोल्हापूर - ६ जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाला यंदा जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या उत्तराखंडमधील तुंगनाथ या महादेव मंदिरातून जल आणले जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर हायकर्सची १९ जणांची टीम आज रवाना झाली आहे. १ मार्च रोजी ही टीम कोल्हापुरात परतणार आहे, तसेच सहा जून रोजी होणाऱ्या राज्याभिषेक वेळी हे जल खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे दिले जाणार आहे.
हेही वाचा - कोल्हापूर: नियमांचे पालन न करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर, अखिल देशवासियांसाठी प्रेरणेचा आणि अभिमानाचा विषय आहे. दरवर्षी प्रमाणे ६ जूनला रायगडावर छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक मोठ्या थाटा माटात संपन्न होत असतो. या राज्याभिषेकसाठी हिमालयातील हिमपर्वत व सह्याद्रीतील गडकोटांवरून पवित्र असे 'जल' आणले जाते.
गेली 8 वर्षे कोल्हापूर हायकर्स ही संस्था हे कार्य काटेकोरपणे पूर्ण करत आहे. यंदाची मोहीम जगातील सर्वात उंचावर असणाऱ्या शंभू महादेवाचे मंदिर म्हणजेच, तुंगनाथ येथे असणार आहे. हे ठिकाण १२ हजार ७३ फूट उंच असून यावर्षी आम्ही शिवराज्याभिषेकसाठी तुंगनाथ येथून हे जल घेऊन येणार आहे. जगातील सर्वात उंच ठिकाणी असणारे हे महादेव मंदिर आहे. यासाठी सर्व मोहीमवीर पूर्ण क्षमतेने तयार झाले आहेत. त्यासाठी आज ही टीम रवाना झाली आहे.
उद्या मुंबईतून ही टीम उत्तराखंडला रवाना होईल. रायगडावर होणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा ३५० वर्षांपूर्वीच्या राज्याभिषेक सोहळ्याची जणू पुनर्प्रचिती देणारा असतो. दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर हायकर्स शिवराज्याभिषेकसाठी हे जल ठीक ठिकाणांहून आणत असतात. यावेळी कोल्हापूर हायकर्सचे युवा शिलेदार हे जल आणण्यासाठी तुंगनाथ येथे रवाना होत आहे. शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा पवित्र होण्यासाठी या जलाचा अभिषेक केला जातो. हे पवित्र जल आणणाऱ्या कोल्हापूर हायकर्सच्या सर्व युवा शिलेदारांचे कौतुक आहे, असे दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके म्हणाले.
या मोहिमेत अमर शिंदे, तेजश्री भस्मे, अक्षय पाटील, काश्मिरा सावंत, अजिंक्य पाटील, शंकर जाधव, अभी चव्हाण, योगेश सावंत, निनाद कुलकर्णी, शीतल कुलकर्णी, सायली सावंत, इशा जाधव, सविता घुगे, पवन घुगे, अमृत महाडिक, वैशाली शहा सहभागी झाले आहेत.
हेही वाचा - कोल्हापूर : 'रोटी डे' निमित्ताने अनेकांचे दातृत्वाचे हात आले पुढे