विरोधी पक्षातील नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी- सुधीर मुनगंटीवार

राज्यात मंत्र्यांकडून मोठे कार्यक्रम हाती घेतले जात असून मोर्चे काढले जात आहेत. तसेच आंदोलने केली जात आहेत. मात्र यामुळे कोरोना पसरणार नाही अशा प्रकारची गुप्त माहिती राज्यातील मंत्र्यांना मिळाली असावी असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
मुंबई - मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसांत कोरोना संदर्भात आढावा घेऊन लॉकडाउन लागू होणार कि नाही याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. त्याच्या या वक्तव्यावरुन भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार
हेही वाचा - मंत्रालय कोरोना अपडेट : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण