मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काँग्रेसकडून हरताळ! तर 50 लोकांच्या वर प्रवेश नाही - नाना पटोले
congress

सध्या राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुन्हा एकदा राज्य कोरोनाच्या कचाट्यात सापडेल की काय? अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असताना, मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक सभा, मेळावे, पक्षीय बैठका तसेच लग्नसोहळे, कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई - महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडून राज्य निवड मंडळाची बैठक बोलावण्यात आली. मात्र, या बैठकीत कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. गेल्या रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जनतेसहित सर्व राजकीय पक्षांना केले आहे. तसेच सध्या पक्ष वाढवण्यापेक्षा कोरोनाला थांबवणे गरजेचे आहे, म्हणून पक्षीय कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही आज (मंगळवारी) काँग्रेसकडून नियोजित बैठक घेण्यात आली. या बैठकीत कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळाले नाही. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हा सार्वजनिक कार्यक्रम नसून पक्षाची रणनिती ठरवण्याबाबत आहे. यात 50 लोकांच्यावर एकालाही प्रवेश नसून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर, मंत्री अमित देशमुख यांच्यासहित सर्व कोअर कमिटीचे सदस्य हजर होते.

हेही वाचा - रेखा जरे हत्यांकांड : बाळ बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन -

सध्या राज्यात आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुन्हा एकदा राज्य कोरोनाच्या कचाट्यात सापडेल की काय? अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असताना, मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक सभा, मेळावे, पक्षीय बैठका तसेच लग्नसोहळे, कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सरकारमधील मुख्य पक्षाकडून हरताळ फासला जात आहे, अशी परिस्थिती काँग्रेसच्या बैठकीतून समोर येताना दिसत आहे.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.