तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन - पालकमंत्री अस्लम शेख
V

राज्याच्या अनेक भागांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईतही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात मुंबई अडकली तर त्यातून बाहेर निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.

मुंबई - मुंबईत झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या चिंतेची बाब असून यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलंय.

पालकमंत्री अस्लम शेख


पालकमंत्र्यांचे आवाहन

राज्याच्या अनेक भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईतही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात मुंबई अडकली तर त्यातून बाहेर निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, नागरिकांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर मुंबईकरांनी नियम पळाले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री यांनी दिला आहे.

सभा, सोहळे बंद करण्याचे आदेश

सध्या मुंबईत ठिकठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळतेय. अनेक ठिकाणी लग्नसोहळे, तसेच पर्यटनस्थळी मोठी गर्दी होताना दिसतेय. त्यामुळे आपणच कोरोनाला आमंत्रण देतोय अशी स्थिती निर्माण होत असून यावर आवर घालणे गरजेचे असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व सभा, सोहळे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.


मुंबईतील कोरोनाची वाढती आकडेवारी चिंताजनक

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील राणीची बाग, उद्याने, लोकल सेवा सुरू करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून 900पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. 21 फेब्रुवारीला 921 रुग्ण मुंबईत सापडले. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत सध्या 7276 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 346 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या 68 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1017 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 31 लाख 33 हजार 429 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.


हेही वाचा - कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या वरवरा राव यांना जामीन मंजूर

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.