466 रेल्वे तिकिट दलालांवर कारवाई, 2 कोटी 78 लाख रुपयांच्या तिकीटे जप्त
संग्रहित

रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 466 दलालांचा शोध घेत त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. अटक केलेल्या दलालांकडून 2 कोटी 78 लाख किंमतीचे एकूण 14 हजार 343 तिकिटे जप्त केल्या आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांचे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली आहे. रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 466 दलालांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. अटक केलेल्या दलालांकडून 2 कोटी 78 लाख किंमतीचे एकूण 14 हजार 343 तिकिटे जप्त केल्या आहे.

मध्य रेल्वेच्या पाचही विभागात कारवाई

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात फक्त आरक्षित तिकिटांवरच प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. अनेक तिकीट दलाल एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा तिकीट दलालाविरोधात मोहीम सुरू केली आहे. आरपीएफच्या पथकाने सायबर सेल आणि इतर माहितीच्या आधारे छापेमारीही केली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांवर हे छापे टाकण्यात आले.

मुंबईत 262 दलालांवर कारवाई

मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा दलाने वर्ष 2020मध्ये दरम्यान, रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार 466 गुन्हे दाखल केले आहेत. या छापेमारीत 2 कोटी 78 लाख किंमतीचे एकूण 14 हजार 343 तिकिटे जप्त केली. ज्यात 14 हजार 65 ई-तिकिटे आणि 278 काउंटर तिकिटांचा समावेश आहे आणि 492 जणांना अटक करण्यात आली. मध्य रेल्वेवर नोंदविण्यात आलेल्या या 466 प्रकरणांपैकी 253 गुन्हे हे मुंबई विभागात दाखल झालेली असून 1 कोटी 43 लाख किंमतीची 7 हजार 2 तिकिटे जप्त करण्यात आली ज्यात 6 हजार 863 ई-तिकिटे आणि 139 काउंटर तिकिटांचा समावेश आहे आणि एकूण 262 जणांना अटक करण्यात आली.

हेही वाचा - कोरोनाची धास्ती! मंत्रालयातील पासवर निर्बंध आणा; अधिकारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.