उर्जामंत्र्यांच्या मुलाच्या लग्नात इंधन दरवाढीचा निषेध; नवजोडप्याला पेट्रोल-डिझेलची भेट
Breaking

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. या लग्नात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडर भेट देत इंधनदरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

नागपूर - राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. या लग्नात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडर भेट देत इंधनदरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

अनोख्या पद्धतीने नोंदवला निषेध -

सध्या पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ ही सर्वसामान्यांची कंबरड मोडणारी आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल याच्या विवाहात युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंग आणि पदाधिकाऱ्यांनी चक्क वधू-वरांना पेट्रोल-डिझेल आणि सिलेंडर भेट दिले. तुमसर येथे हा विवाह पार पडला. दररोज पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडर च्या दरात वाढ होते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असताना देशात मात्र पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे. याचाच निषेध अनोख्या पद्धतीने करण्यात आला.

हेही वाचा - आंदोलन झाल्याने कायदे रद्द होत नसतात - केंद्रीय कृषीमंत्री

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.