मुंबईचा विकास आव्हानात्मक, सर्व घटकांना सामावून घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री

मुंबई शहरासह उपनगरातील चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोस्टल रोड, जीव्हीएलआर, जीएमएलआर, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.

मुंबई - घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या गजबजलेल्या मुंबईचा विकास आव्हानात्मक असून सर्व घटकांना सोबत घेऊन तो मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एमएमआरडीए अंतर्गत केल्या जाणाऱ्या शिवडी-वरळी उन्नतमार्गाचे भूमीपूजन, स्मार्ट पार्किंग प्रकल्प, सायकल ट्रक आणि वांद्रे येथील पदपथ सेवेच्या लोकापर्ण सोहळ्यात ते बोलत होते.

मुंबईचा विकास आव्हानात्मक, सर्व घटकांना सामावून घेणार
मुंबईचा विकास आव्हानात्मक, सर्व घटकांना सामावून घेणार

2022पर्यंत काम पूर्ण होणार
मुंबई शहरासह उपनगरातील चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोस्टल रोड, जीव्हीएलआर, जीएमएलआर, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. नवी मुंबई, खारघर आणि रायगडपर्यंतचा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत गाठण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीए अंतर्गत शिवडी ते वरळी उन्नतमार्गाचे काम हाती घेतले आहे. 2022पर्यंत हे काम पूर्ण केला जाणार आहे.

आव्हानात्मक काम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, 1966ला आम्ही वांद्रेतील कलानगरला रहायला आलो. लोकांनी वेड्यात काढले. आजूबाजूला खाडी, संपूर्ण मॅग्रोव्हजने वेढलेला परिसर होता. आता रहदारी वाढल्याने रस्ते अपुरे पडत आहे. येथे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी रस्ते वाहतुकीचे जाळे विणले जात आहे. शिवडी-वडाळा उन्नत मार्गावरुन नवी मुंबई, खारघर ते रायगडपर्यंतचा प्रवास काही तासांत होईल. मात्र, हा मार्ग बनवणे आव्हानात्मक काम असून मुंबईकरांना आव्हाने कोणती हे दाखवणे गरजेचे आहे. एकीकडे परवडणारी घरे असावीत असे म्हणतो, तसेच पडवणारी रहदारी असली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


सायकल ट्रॅक तसेच पदपथ
मुंबईत सर्रास लोकलने प्रवास केला जातो. मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशावेळी कोविडचा प्रसार रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्था वाढवण्याची गरज आहे. मात्र, हा विकास एकमार्गी होऊ शकत नाही. मुंबईतील डबेवाले डबे पोहचवण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून सायकल ट्रॅक बनवण्यात येणार आहे. रस्त्यांवरील पार्किंग अडचणीच्या ठरतात. ही समस्या सोडवण्यासाठी बीकेसी येथे स्मार्ट पार्किंग व्यवस्था उपलब्ध केली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांसाठी सुस्थितीतील पदपथ तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

मुंबईचा विकास आव्हानात्मक,
मुंबईचा विकास आव्हानात्मक,
सर्वांना घटकांना सामावून घेणारदेशातील सर्वात मोठा शिवडी ते न्हावा-शेवा सुमारे 22 किलोमीटरचा सी-लिंक होत आहे. यांत्रिकीपध्दतीने हे काम केले जात असून आतापर्यंत पाच किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला आहे. या मार्गामुळे मुंबईचे वैभव, फ्लेमिंगो पक्षी जवळून पाहता येणार आहेत. आरेतील प्राणी, पक्षी, आदिवासी पाड्यांनी आपल्याला स्विकारले आहे. आपणही त्यांना स्विकारणे गरजेचे आहे. सर्व घटकांना सामावून घेऊनच मुंबईचा विकास करायला हवा, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मविआची पाऊले विकासाच्या दिशेने
मुंबईचा विस्तार होतो आहे. लोकसंख्याही वाढत असल्याने गजबजलेल्या मुंबईचा विस्तार करणे आव्हानात्मक काम आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका कटीबध्द आहे. राज्यातील विकासाच्या दृष्टीनेही महाविकास आघाडी सरकार पाऊले टाकत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रकल्प महत्वपूर्ण ठरतील
मुंबईतील हे महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प आहेत. यामुळे वाहतुकीत मोठी सुधारणा होईल. वेळ आणि पैशाची बचत होईल. मुंबई आणि नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्याला जोडणारे हे प्रकल्प महत्वपूर्ण ठरतील, असे नगरविकास मंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या पायाभूत सुविधा उभारणी कामांबरोबरच एमएमआरडीएने कोविड संकटकाळात मोठी कोविड सेंटरही उभारली आहेत. हे उल्लेखनीय आहे. एमएमआरडीएचे सर्व प्रकल्प वेगात प्रगतीपथावर असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांना इज ऑफ लिव्हिंगचा अनुभव घेता यायला हवा
एमएमआरडीएची मुंबईत होत असलेली पायाभूत सुविधांची कामे आव्हानात्मक आहेत. यातील अनेक कामे दाट लोकवस्तीत होत आहेत. या कामांमुळे स्थलांतरितांचे पुनर्वसन याच भागात करण्यावर भर देण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच पादचाऱ्यांसाठी पदपथ महत्त्वाचे असतात. त्याचीही उभारणी करण्यात येत आहे. सायकल ट्रॅकही उभारण्यात येणार आहेत. नागरिकांना 'इज आँफ लिव्हिंग'चा अनुभव घेता आला पाहिजे या दृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करत या सर्व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


असा असेल मार्ग..
शिवडी ते वरळी उन्नतमार्ग-
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या मुंबई बाजूकडील वाहतूक विकीरण व्यवस्थेसाठी शिवडी ते वरळी उन्नतमार्ग प्रकल्पाचे बांधकाम हाती घेतले आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पावरुन येणाऱ्या वाहतूकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोहचून वांद्रे–वरळी सागरी सेतूने वांद्र्याहून पश्चिम उपनगरांकडे जाता येईल. प्रस्तावित उन्नत मार्गाची लांबी सुमारे 4.5 कि.मी इतकी आहे.

बीकेसीला उड्डाणपुल-
कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगति महामार्ग, बांद्रा – कुर्ला जोडरस्तासहीत इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतुक सुरळीत होऊन वाहतुकीची कोंडी सुटण्यास आणि वेळेत बचत होईल.

बीकेसीमधील पदपथ व जंक्शन
बीकेसीतील नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक दुचाकींचा वापर लोकप्रिय होत आहे. जंक्शनदरम्यानच्या रस्त्यांवर सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्र इत्यादी सुविधा वाढवणे, पार्किंग, इ- चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, बोलाड्स, वाहतूक चिन्हफलक इत्यादीसह स्ट्रीट फर्निचर इ.ची तरदूत करण्यात आली आहे.


सुरक्षित सायकल ट्रॅक-
अस्तिवात असलेल्या झाडांची मुळांचे रक्षण करणे व नविन झाडे लावण्यासाठी सच्छिद्र काँक्रिट जाळी यांचा वापर करुन झाडांचे संरक्षण करण्याचे नियोजन, वाहनांच्या ई- चार्जिंग साठी जागा, वांद्रे कुर्ला संकुल येथील स्मार्ट वाहनतळ प्रकल्प, बांद्रा - कुर्ला संकुल व नरीमन पाँईंट येथील विविध वाहनतळांसाठी स्मार्ट पार्किंग, तत्वावर स्वयंचलित वाहनतळे, वाहने पार्क करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा, ॲप विकसित करणे, पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, वाहनतळामध्ये इलेक्ट्रीक चार्जिंग सोलर, चार्जिंगची सुविधा, विश्रांतीगृह तसेच खानपानाची सुविधा असणार आहे.


कार्यक्रमाला हे उपस्थित-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, मंत्री नवाब मलिक, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे प्रमुख आर. ए. राजीव आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते.

हेही वाचा - राज्यात लॉकडाऊन की संचारबंदी? थोड्याच वेळात मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.