नागपूरमधील प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचे देशात अनुकरण होईल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Metro

नागपूरची मेट्रो ही स्टँडर्ड गेज मेट्रो आहे. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गावर मेट्रो कोचेस चालवून नागपूर नजिक सॅटेलाईट सिटीज नागपूरला जोडणे हा प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले.

नागपूर - नागपूरची मेट्रो ही स्टँडर्ड गेज मेट्रो आहे. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गावर मेट्रो कोचेस चालवून नागपूर नजिक सॅटेलाईट सिटीज नागपूरला जोडणे हा प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ब्रॉडगेज प्रकल्पामध्ये असणाऱ्या रेल्वे कोचेसची मालकी खासगी गुंतवणूकदारांना दिल्यास ही स्थिती गुंतवणूकदार, प्रवासी, भारतीय रेल्वे, महामेट्रो, तसेच एम.एस.एम.ई ला पूरक आणि फायदेशीर असेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले.

माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हेही वाचा - मुंबईचा विकास आव्हानात्मक, सर्व घटकांना सामावून घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तसेच, हा राज्यातील एकमेव असा पहिलाच प्रकल्प असून आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि याचे अनुकरण संपूर्ण देशात होईल, असे प्रतिपादनही गडकरी यांनी केले. महामेट्रो, केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत विकास संस्था, नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ब्रॉडगेज रेल्वे मेट्रोसाठी गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन आज स्थानिक साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्थानकातील सभागृहात करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून नितीन गडकरी बोलत होते.

याप्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, एमएसएमई विकास संस्थेचे संचालक पी.एम. पार्लेवार उपस्थित होते. स्टँडर्ड गेजची मेट्रो, ब्रॉडगेजची मेट्रो आणि नागपूरची बस फॅसिलिटीचे एकत्रीकरण करून नागपूर शहरातील कामठी, खापरी, बुटीबोरी, इतवारी, कळमना या रेल्वे स्टेशनला ब्रॉडगेज मेट्रोमध्ये मुंबईच्या लोकल प्रमाणे एकत्रीकरण करून रेल्वेची इंटर-कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल, असे गडकरी यांनी सांगितले. तसेच, या कोचेसची मालकी ही प्राधान्याने विदर्भातील उद्योजकांना देण्यात येईल, जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही गकडकरी यांनी नमूद केले.

ब्रॉडगेज रेल्वेमुळे नागपूर ते अमरावती दीड तासात

प्रस्तावित ब्रॉडगेज मेट्रो स्टेशनमुळे नागपूर नजिक काटोल, भंडारा, वर्धा, अमरावती, नरखेड, रामटेक, वर्धा यासारखे सॅटेलाईट टाऊन्स नागपूरला जोडले जातील. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असणारी प्लॅटफॉर्म, सिग्नल व्यवस्था आधीपासूनच तयार असून यावर लागणारा मेट्रोचा रोलिंग स्टॉक सदर प्रकल्पात लागणार आहे. अशा कोचेसची किंमत ही साधारणतः 30 कोटी असणार असून त्या मेट्रोच्या खरेदीसाठी केंद्रीय सुक्ष्म, लघू मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे गुंतवणूकदारांना इंटरेस्ट सबवेंशन व इतर अर्थसहाय्याचीसुद्धा उपलब्धता होणार आहे. या ब्रॉडगेज रेल्वेचा वेग हा 120 किलोमीटर प्रति तास असून, यामुळे नागपूर ते अमरावती हे अंतर केवळ दीड तासात कापणे शक्य होणार आहे.

प्रकल्पाची सुरुवात एक-दीड वर्षात होईल

ब्रॉडगेज मेट्रोमध्ये विमानाप्रमाणेच इकॉनॉमी, तसेच बिझनेस क्लास राहणार असून मनोरंजन, खानपान सुविधा उपलब्ध राहणार आहेत. या मेट्रोमध्ये असणाऱ्या जाहिराती, खानपान आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा वस्तू विक्रीचे अधिकार हे संबंधित खासगी गुंतवणूकदारांना असणार असून याचा फायदा त्यांना होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाची सुरुवात एक-दीड वर्षात होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - उमरेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून माजी नगरसेवकाच्या घरी लूटमार

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.