नांदेड : अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा पत्नीनेच केला खून
Divyang's

इतवारा भागातील रहिवाशी सय्यद मनसबअली सय्यद मुमताज अली (वय - ४६) हा १४ फेब्रुवारीपासून घरातून निघून गेल्याने ग्रामीण पोलिसांनी हरवल्याची नोंद केली होती.

नांदेड - काही दिवसांपुर्वी बोंढार शिवारातील पुलाजवळ घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. अपंग पती अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने मृताच्या पत्नीनेच इतर दोघांच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पत्नीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

हरवल्याची केली होती नोंद -

इतवारा भागातील रहिवाशी सय्यद मनसबअली सय्यद मुमताज अली (वय - ४६) हा १४ फेब्रुवारीपासून घरातून निघून गेल्याने ग्रामीण पोलिसांनी हरवल्याची नोंद केली होती. दरम्यान, १९ फेब्रुवारीला एक मृतदेह बोंडार शिवारातील पुलाजवळ आढळून आला होता. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी मृताची ओळख पटू शकली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील आणखी नऊ गावांमध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन

पोलीस तपासात झाले उघड -

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. लग्नानंतर मृत अपंग झाल्याने त्याच्या पत्नीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध जुळल्यानंतर लग्न करण्याचे ठरले. मात्र, पतीन विरोध केल्याने त्याची हत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.