दिंडोरीत एकाच दिवशी १२ करोना रुग्णांंची वाढ; एका शिक्षकाचा मूत्यू
Breaking

शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांची हमी घेणारे शिक्षकच कोरोनाबाधित निघाल्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे का असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. परिणामी शाळा, महाविद्यालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिंडोरी ( नाशिक ) -दिंडोरी तालुक्यात करोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या मंदावली होती. मात्र, एकाच दिवशी १२ पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढल्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात एका शिक्षकांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात नियमांची काटेकोर अंबलबजावणी सुरु झाली आहे .

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत १५४८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यांत १४७६ रुग्णांनी करोनावर मात केली असून करोनामुळे तालुक्यात ४८ लोकांचा मूत्यू झाला आहे तर सध्या २४ करोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. मध्यातंरी तालुक्यात व जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या घटल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यांचे दिसून येत आहे. लोकांकडून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवल्यामुळे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी केल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

शाळा, महाविद्यालयातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

दिंडोरी तालुक्यात सध्या शिक्षकांची करोना तपासणी करण्यात येत असून पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या वाढत आहे. परिणाम पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यत शाळा ,महाविद्यालय चालू झाल्यापासून एकही विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह झाल्याचे समजले नाही. मात्र, शिक्षकच करोना पॉझिटिव्ह निघत असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे का? असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे. सर्वच शिक्षण संस्थानी पालकांकडून विद्यार्थ्यांचे हमीपत्र लिहून घेतले आहे. मात्र ज्यांनी हमीपत्र लिहून घेतले आहे ते शिक्षकच कोरोनाबाधित झाल्यामुळेे शाळा, महाविद्यालयातील सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यांत जवळ जवळ सर्वच शिक्षक बाहेरून अपडाउन करत असल्यामुळे शिक्षकांच्या बाधिताची संख्या वाढली आहे.

शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करा
दिंडोरी व पेठ तालुक्यातील जनतेने कामाशिवाय गावाबाहेर जाणे टाळावे. त्याप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करावे. मास्क ,सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, शेतकरी वर्गाने मार्केटमध्ये काळजी घ्यावी तसेच प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने गावात या संदर्भात खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. संदिप आहेर यांनी केले आहे.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.