नाशिक मनपात तक्रारदारांची नावे सार्वजनिक होत असल्याने तक्रारदारांना मनस्ताप
Breaking

मनपात तक्रारदारांची नावे सार्वजनिक होत असल्याने तक्रारदार पुढे येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कायद्यानुसार शासकीय कार्यालयात तक्रार घेऊन येणाऱ्यांची नावे गुप्त ठेवणे गरजेचे आहे, मात्र नाशिक महानगरपालिकेत असे होत नसल्याचे समजले आहे.

नाशिक - मनपात तक्रारदारांची नावे सार्वजनिक होत असल्याने तक्रारदार पुढे येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कायद्यानुसार शासकीय कार्यालयात तक्रार घेऊन येणाऱ्यांची नावे गुप्त ठेवणे गरजेचे आहे, मात्र नाशिक महानगरपालिकेत असे होत नाही. त्यामुळे, अनेक नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे समजले आहे.

माहिती देताना तक्रारदार

हेही वाचा - येवल्यात विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकला अधिक स्मार्ट करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी एनएमसी सर्व्हिस हे अ‌ॅप विकसित केले होते. नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, कामात पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन सर्व्हिस सुरू करण्यात आली. अॅपच्या माध्यमातून जन्म, मृत्यू दाखले, लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्र, घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच विविध कर भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली. तसेच, नागरिक या अॅपवर अतिक्रमणाबाबत देखील तक्रार नोंदवू शकतात.

प्रवीण गेडाम यांची बदली झाल्यानंतर काही वर्षे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी चांगल्या प्रकारे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले. सात दिवसांच्या आत ऑनलाईन तक्रारींचे निराकरण झाले नाही, तर मुंडे हे थेट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावत कारवाईचा बडगा उगारायचे. मात्र, आता मुंडे जाताच पुन्हा एकदा नागरिकांना तक्रारी सोडवण्यासाठी मनपाच्या पायऱ्या चढून चपला झिजवाव्या लागत आहे.

मनपातून तक्रारदारांची नावे होते लिक

कुठल्याही शासकीय कार्यालयात तक्रार करणाऱ्या तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवावे लागते. मात्र, नाशिक महानगरपालिकेत तक्रारकर्त्यांचे नाव सार्वजनिक होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. आर्थिक देवाणघेवाणातून नाव लिक होत असल्याने याचा त्रास तक्रारदारांना सहन करावा लागत आहे.

नाव लिक झाल्याने मला धमकी आली - आप प्रवक्ता

नाशिक महानगर पालिकेतील कर्मचारी नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यास असमर्थ आहे. मी नाशिक महानगरपालिकेच्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून एका अतिक्रमित हॉटेलबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, या केसमध्ये माझे नाव जाहीर झाल्याने हॉटेल चालक काही गुंडांना घेऊन माझ्या घरी पोहचले आणि मला धमकी देऊन गेले. अशात माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. माझा थेट आरोप आहे की, नाशिक मनपा मधून तक्रारदारांची नावे लिक होत असल्याने लोक तक्रार करण्यास पुढे येत नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे, असे मत आपचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी व्यक्त केले.

दोन महिने झाले माझी तक्रार सुटली नाही

आधी माझ्या घराचे लाईट बिल 500 ते 700 रुपयांपर्यंत येत होते. तेच बिल आता दोन महिण्यांपासून 3 हजार रुपयांच्या घरात येत आहे. त्यामुळे, मी तक्रार करायला गेलो असता मला चांगली वागणूक मिळाली नाही. मी त्यांना मीटर चेक करण्यास सागितले, मात्र विद्युत कर्मचारी अद्याप आले नाही. उलट मला बिल भरले नाही, तर वीज कट केली जाईल असे सांगितल्याचा आरोप राजेश पाटील यांनी केला.

हेही वाचा - शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी शासन स्तरावर पाठबळ - दादा भुसे

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.