
शेतीपूरक उद्योगांना शासन स्तरावर पाठबळ देवून चालना देणार, असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. पिंपळगाव शहरातील पूर्वा केमिकल प्रायव्हेट लिमिटेडच्या बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्रास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट देत माहिती घेतली.
नाशिक - मधुमक्षिका पालन उद्यान आणि प्रशिक्षण केंद्र व बसवंत फळ प्रक्रिया उद्योग हे शेतीपुरक उद्योगांचे खरोखरच आदर्शवत उदाहरण असून या माध्यमातून शेतकऱ्यांना विकासाची एक नवी दिशा मिळत आहे, अशा शेतीपूरक उद्योगांना शासन स्तरावर पाठबळ देवून चालना देणार, असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. पिंपळगाव शहरातील पूर्वा केमिकल प्रायव्हेट लिमिटेडच्या बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्रास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट देत माहिती घेतली.
पिंपळगाव बसवंत येथील मुखेड तालुक्यातील संजय पवार यांनी साकरलेले मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र, बसवंत फळप्रक्रिया उद्योग व आदर्श गाव सेवरगाव प्रतिकृती पाहणी दौऱ्याच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. बसवंत मधमाशी उद्यानासारखा प्रकल्प समाज भावनेतून व चाकोरीच्या बाहेर जाऊन सुरू केला तो आदर्शवतच असल्याचे सांगत मंत्री भुसे यांनी बसवंत मधमाशी प्रकल्पाची पाहणी करीत पूर्वाचे संचालक पवार यांच्याकडून माहिती घेतली.
तरुण शेतकऱ्यांना रोजगाराची संधी
मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणाद्वारे तरुण शेतकऱ्यांना निश्चितच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतीवर आधारित अनेक उद्योग प्रकल्प राज्यभरात राबविले जात आहेत. यात फळांवर प्रक्रिया, भाजीपाला साठवणुकीसाठी शीतगृहे, गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीला भविष्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, असा भुसे यांनी व्यक्त केला. पुढील आठवड्यात कृषी विद्यापीठाचे अधिकारी या ठिकाणी भेट देवून हा प्रकल्प तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहचविता येईल याचे नियोजन करतील, असेही कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.