विशेष: वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रशांत बनला 'कनिष्ठ वैज्ञानिक'
प्रशांत

पालघर जिल्ह्यातील प्रशांत नरेश पाटील यांनी बनवले शेती अवजारातून वीज निर्मिती करणारं यंत्र आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेत तृतीय क्रमांक

पालघर - शेती अवजारातून वीज निर्मिती करणारं यंत्र विकसित केले गेले आहे. हे यंत्र विकसित करणारे नवतरुण सायंस्टीस्ट प्रशांत नरेश पाटील यांनी पालघर जिल्ह्यासह भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले आहे. या संशोधन स्पर्धेत अमेरिका, जर्मनी, रशिया, इराण, मेक्सिको, कँनडा या सारखे देश सहभागी झाले. त्यांच्या शेती अवजारातून उर्जा निर्माण करणाऱ्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. प्रशांत पाटील यांना सायन्स आणि तंत्रज्ञान विभागाकडून कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या नवतरुण वैज्ञानिकाशी ईटीव्ही भारतने संवाद साधला.

वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रशांत बनला 'कनिष्ठ वैज्ञानिक'

घरची परिस्थिती बेताचीच-

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अबिटघर गावतील प्रशांत नरेश पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. प्रशांत हे आपल्या आईसोबत राहतात. शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रशांत यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यांनी गावतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. त्यांनतर त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजचे शिक्षण घेतले. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील एका शालेय संस्थेत पुढिल शिक्षण घेत असताना प्रशांत पाटील यांनी शेती अवजारातून उर्जा र्निर्मीतीचे स्त्रोत यंत्र तयार केले.

शंभर घरांना रात्रभर विद्युत पुरवठा-

भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि इथल्या शेतकरी वर्गाला आपली शेतीची नांगरणी बरोबरच इतर कामे करीत असताना त्या शेती अवजारातून वीज निर्मीती होते, असे यंत्र प्रशांत पाटील यांनी विकसित केले आहे. या उर्जेतून शंभर घरांना रात्रभर विद्युत पुरवठा होऊ शकतो, असा प्रोजेक्ट त्यांनी तयार केला आहे.

आई-वडील प्रेरणास्थान-

प्रशांत पाटील यांचे प्रेरणास्थान आई-वडील आहेत. त्यांनतर त्यांना पुढील शिक्षणात या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक सुद्धा त्यांचे प्रेरणास्थान असल्याचे प्रशांत सांगतात. ते शालेय स्पर्धा परिक्षेत ग्रामीण भागात ते जिल्हा स्तरावर भाग घेत होते. तेव्हा त्यांच्या या सुरवातीच्या प्रोजेक्टला पसंती मिळत नव्हती. पुढे त्यांनी जिद्द कायम ठेवून मार्गदर्शनाच्या जोरावर शेती अवजारातून वीज निर्मीती हा प्रोजेक्ट देशाचे नावलौकिक करणारा निर्माण केला.

रशिया व इतर देशातून प्रोजेक्ट बाबत ऑफर-

प्रशांत यांच्या मौलीक कामगिरीने वयाच्या 22व्या वर्षी संरक्षण खात्याकडून नुकताच त्यांचा अटारी सीमा येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना रशिया व इतर देशातून प्रोजेक्ट बाबत ऑफर येऊ लागल्या आहेत. पण प्रशांत पाटील यांनी आपली सेवा आपल्या राष्ट्राकरीता समर्पित करण्याचा मनोदय ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केला.

नवतरुणांनी शिक्षणाबरोबर रिसर्चवरही भर दिला पाहिजे. इतर देशामधील शालेय विद्यार्थी काही ना काही विषयवार संशोधन करीत असतात. आपल्याकडील मुलांचाही याकडे कल असावा, असं मत कनिष्ठ वैज्ञानिक प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- राज्यात तरुण मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार; आकडेवारी चिंताजनक

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.