अलिबाग लायन्स क्लबतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम आणि महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोना महामारी असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आले असले, तरी शिवजयंतीचे औचित्य साधून सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून या स्पर्धेला सुरुवात झाली.
रायगड - शिवजयंतीचे औचित्य साधून माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि अलिबाग नगर परिषदेतर्फे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 40, 30 आणि 20 किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटात पार पडलेल्या या सायक्लोथॉन मध्ये 300हून अधिक नागरिक, सायकलपटू सहभागी झाले. सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागचा उद्देश होता. क्रीडाभुवन येथून हा उपक्रम सुरू झाला. तर, छत्रपती शिवाजी महाराज चौकात याचा समारोप झाला. सर्व सहभागींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
लायन्स क्लब अलिबाग आणि नगरपरिषदेतर्फे सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन
अलिबाग लायन्स क्लबतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम आणि महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोना महामारी असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आले असले, तरी शिवजयंतीचे औचित्य साधून सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून या स्पर्धेला सुरुवात झाली.
सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी यासाठीचा उपक्रम
सध्या वाहनांची संख्या वाढू एकीकडे प्रदूषण वाढू लागले आहे. हल्ली नागरिक सायकल, चालणे याकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे सायकल चालविणे हा व्यायाम आरोग्यसाठी फलदायी आहे. त्यामुळे सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी सायक्लोथॉन उपक्रम राबविण्यात आला असल्याचे लायन्स क्लबचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले. लायन्स क्लबचे अध्यक्ष अभिजित पाटील , नगराध्यक्ष प्रशांत नाईक, इतर नगरसेवक, लायन्स पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - हार्दिक, विराटपाठोपाठ टीम इंडियाचा अजून एक खेळाडू झाला 'बाबा'