सांगली महापालिकेत भाजपाला दे धक्का,राष्ट्रवादीचा महापौर तर उपमहापौर काँग्रेसचा
Breaking

सांगली महापालिकेत भाजपच्या महापौर, उपमहापौरपदाच्या उमेवारांचा परभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

सांगली - भाजपच्या नगरसेवकांनी भाजपला कात्रजचा घाट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गळ्यात महापौरपदाची माळ घातली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपाला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे. तुलनेने संख्याबळ कमी असताना देखील राष्ट्रवादीने भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करत महापौर पद आपल्या पदरात पाडून घेतले आहे.

भाजपा नगरसेवकांनीच दाखवला भाजपाला कात्रजचा घाट -

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेंस राहिलेल्या या निवडणुकीत भाजपची सत्ता अखेर संपुष्टात आणत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महापौर आणि उपमहापौर पद भाजपाकडून हिसकावून घेतले आहे. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदी विजयी झाले आहेत. भाजपाच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत मतदान केले.

सत्ता असताना पराभव -

सांगली महापालिकेमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. 41 अधिक दोन अपक्ष असे संख्याबळ असल्याने भाजपाने पुन्हा विजयाचा दावा केला होता. मात्र, भाजपामध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेससोबत नाराज भाजपा नगरसेवकांना आपल्या गळाला लावून महापौर-उपमहापौर निवडीमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

भाजपाची पाच मते फुटली -

ऑनलाइन मतदान प्रक्रिया पार पडली आणि या मतदान प्रक्रियेमध्ये भाजपाच्या नगरसेवकांनी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले आहे. यामध्ये भाजपाचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत,अपर्णा कदम, नसीमा नाईक या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. भाजपाचे विद्यमान उपमहापौर आनंदा देवामाने आणि नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी गैरहजर राहत मतदान केले नाही.

पडलेली मते -

78 +1 पद रिक्त

77 सदस्य

2 अनुपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेस दिग्विजय सूर्यवंशी 39
भाजपाधीरज सूर्यवंशी 36

उपमहापौर निवडीतही धक्का -

महापौरपदाच्या निवडणुकी बरोबर भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उपमहापौर पदाच्या निवडणूकीत "दे धक्का" देण्यात आला आहे. भाजपाचे उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदूम यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील या ठिकाणी उपमहापौर म्हणून विजयी झाले आहेत.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.