
पाणी पिण्याच्या बहाण्याने हा आरोपी महिलेच्या घरात शिरला होता. त्याने जबदस्ती पीडितेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात 376, 452 अन्वये आरोपी आनंदा साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
सातारा - पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरुन महिलेवर अत्याचार करणार्या आरोपीला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे कारावास आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आनंदा शामराव साळुंखे असे या आरोपीचे नाव आहे.
पाणी पिण्याच्या बहाण्याने हा आरोपी महिलेच्या घरात शिरला होता. त्याने जबदस्ती पीडितेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात 376, 452 अन्वये आरोपी आनंदा साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक डी. डी. चौगुले यांनी या गुन्ह्याचा तपास करून कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. १७ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीसह न्यायालयासमोर आलेले पुरावे ग्राह्य मानले आहेत. यावरुन आरोपीस कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचा भडका; जाणून घ्या आजचे दर