कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात रात्री संचारबंदी; शाळा-महाविद्यालयांत होणार तपासणी
Guardian

महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक यांनी सरकारने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्तपणे अचानक महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सातारा - जिल्ह्यातील काही प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले आहे. कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, 1 फेब्रुवारीपासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के आहे. हॉटेल, रेस्टॉरंट महामार्गांवरील वगळून इतर ठिकाणी व्यवसाय रात्री 11 नंतर बंद ठेवण्यात यावे. लग्न समारंभाला वधूकडील 50 आणि वराकडील 50 अशा 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे. असे आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश यावेळी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात रात्री संचारबंदी

हेही वाचा-कोरोना इफेक्ट : भारतीय रेल्वेला 36 हजार 993 कोटी तर मुंबई लोकलला 500 कोटींचा फटका

शाळा-काॅलेजची होणार तपासणी
जिल्ह्यात महाविद्यालय व शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक यांनी सरकारने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्तपणे अचानक महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. अंमलबजावणी होत नसल्यास कारवाई करावी. जिल्ह्यात 71 टक्के लसीकरण झाले आहे. परंतु यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षीत आहे. खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


हेही वाचा-जळगाव जिल्ह्यात आजपासून रात्री संचारबंदी; शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी


टेस्टींग नाही, तर भोगा परिणाम-

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात वाढत आहे. काही तालुक्यांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याच्या संपर्कात आलेले कोरोनाची तपासणी करून घेत नाहीत, असे आढळल्यास तसेच मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

मेळावे व यात्रा- जत्रांवर बंदी

राजकीय किंवा सामाजिक मेळाव्यांना, यात्रा व जत्रांवर निर्बंध असणार आहे. आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. बैठकीला ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह , मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.