
आपल्या जिल्ह्यात सामना पेपर येत नसल्याचे सांगून त्यांनी आपण सामना कधीच वाचत नसल्याचेही सांगितले. पेट्रोल दरवाढीवरून आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पडळकरांनी सामनावरून शिवसेनेवर निशाणा साधला.
सिंधुदुर्ग - कोकण दौऱ्यावर असलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकावर शब्दांचे आसूड ओढले आहेत. सामना पेपर कोणी वाचत नसल्याचे सांगून शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या कोकणात सामनाच्या किती प्रती येतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या जिल्ह्यात सामना पेपर येत नसल्याचे सांगून त्यांनी आपण सामना कधीच वाचत नसल्याचेही सांगितले. पेट्रोल दरवाढीवरून आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पडळकरांनी सामनावरून शिवसेनेवर निशाणा साधला.

कोकणात सामना किती येतो?
आधी पेट्रोलचे भाव कमी करा, मग राम मंदिरासाठी निधी जमा करा' या सामनात आलेल्या अग्रलेखावर गोपीचंद पडळकर यांनी खरमरीत टीका केली आहे. सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता, मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, कोकणात सामना किती येतो? असा सवालही पडळकरांनी यावेळी केला आहे.
मी तर सामना कधीच वाचला नाही
यावेळी बोलताना पडळकर म्हणाले उगाच बाऊ करू नका. आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळे असल्या विषयात बोलणे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.