सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सकांविरोधात विनयभंगाची तक्रार
Breaking

सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग - जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय. मागील २ महिन्यांपासून डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे पीडित महिलेनं तक्रारीत नमूद केल आहे. दरम्यान मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे डाॅ.श्रीमंत चव्हाण यांनी खुलासा केला आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची ओपीडीसमोर केबिन आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या केबिनच्या बाहेरील बाजूला महिला सुरक्षा तैनात असतात. ही कंत्राटी महिलाही तिकडेच कर्तव्याला असायची. श्रीमंत चव्हाण वारंवार त्या महिलेला कॅबिनमध्ये बोलावून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते.

तर तुला नोकरीवरून काढून टाकेन, पीडितेला धमकी-

‘त्या’ पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, ११ डिसेबर २०२० रोजी मीटिंग घेवून मी सांगेन तसे वागायचे. कोणाला मारायला सांगितले की मारायचे. बुंध्यापासून शेंडयापर्यंत माझी ओळख आहे. माझे कोणीही वाकडे करु शकत नाही, असे मला सांगितले. आपली ड्यूटी त्यांच्या केबिन समोर लागल्यावर ते कोणत्या-कोणत्या कारणाने आपला हात हातात धरुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असत. ड्यूटीवर नसताना सुद्धा फोन करीत मला जिल्हा परिषद जवळ भेटायला या, असे सांगत होते. याबाबत त्यांच्या पत्नीला आपण कळविले. यावेळी त्यांनी १२ फेब्रूवारी २०२१ रोजी ओरोस येथील त्यांच्या बंगल्यावर राहायला येणार आहे. त्यावेळी आपण बोलू, असे सांगितले.

परंतु, त्या आल्याच नाही. १५ फेब्रूवारी रोजी डॉ चव्हाण यांच्या केबिन बाहेर माझी ड्यूटी लागली होती. या दिवशी दुपारी ४ वाजता त्यांनी बेल वाजवली. काय काम आहे म्हणून विचारायला गेले असता, माझा हात हातात धरुन तू मला फार आवडतेस. मी जो वागतो ते बाहेर कोणाला सांगू नको. सांगितलेस तर नोकरिवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. परंतु, त्यांच्या वाढत्या अश्लील चाळ्यामुळे ड्यूटीवर जाण्यास भीती वाटत आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

मला बदनाम करण्याचे षडयंत्र,डाॅ.श्रीमंत चव्हाणांचा खुलासा-

शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यानी सिंधूदुर्गनगरी पोलीस ठाण्यात याबाबत अर्ज दाखल केला आहे. मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. त्यानुसार माझ्या विरोधात आपल्याकडे तक्रार दाखल होणार असल्याचे समजले आहे. परंतु, तक्रारिच्या अनुषंगाने सर्व साक्षीदार व पुरावे याची खात्री करूनच कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात पोलिसांनी भादवी कलम ३५४, ३५४ A (1) (I) व ५०६ नुसार गुन्हा दाखल केलाय. सिंधुदुर्गनगरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा- पोहरादेवी गर्दी प्रकरण : प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.