पंढरीत एका दिवसाची संचारबंदी लागू, भाविकांना सहकार्याचे आवाहन
मंदीर

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून 24 तासांची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वारीच्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी कालावधीत नागरिकांनी व भाविकांना कळसाचे दर्शन, नामदेव पायरी दर्शन घेण्यासाठी तसेच नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे, आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले आहे.

बोलताना अपर जिल्हाधिकारी व अपर पोलीस अधीक्षक

एका दिवसाची असेल संचारबंदी

शहरात भाविकांची तसेच परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी 22 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजल्या पासून ते 23 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत (मंगळवारी पूर्ण दिवस) पंढरपूर शहर व शहरालगतच्या 10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नव्याने मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी तसेच मंदीर समितीने सर्व विधी पार पाडताना कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन पार पाडावेत. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्या, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी जाधव यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आषाढी, कार्तिकीप्रमाणे माघी वारीतही सहकार्य करावे

माघ वारीत बाहेरील भाविक व नागरिक पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्हा, तालुका व शहर अशी त्रिस्तरीय नाकाबंदी ठेवण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी विनाकारण फिरु नये. आषाढी, कार्तिकी वारीत वारकरी साप्रंदायाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या प्रकारे सहकार्य केले असेच सहकार्य माघी वारीत करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.

असा असेल पोलिसांचा फौजफाटा

संचारबंदीच्या कालावधीत बाहेरील नागरिकांनी व भाविकांनी शहरात येऊ नये. यासाठी शहरमध्ये सुरक्षिततेसाठी पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, शंभर पोलीस अधिकारी तसेच सुमारे 1 हजार 500 पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ व होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाकाळात नागरिकांनी मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहनही अपर पोलीस अधीक्षक झेंडे यांनी केले.

हेही वाचा - पंढरीतील मठ झाले रिकामे; 80 टक्के वारकरी परतले घरी

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.