पोलिसांचा वाहतूक सप्ताह संपताच पुन्हा 'ट्रॅफिक जॅम'
वाहतूक

कल्याण शहरातील सहजानंद चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. या चौकात खासगी बसेसच्या थांब्याला कल्याण वाहतूक विभाग व महापालिका प्रशासनाने 2004 सालापासून मनाई केली आहे. तरी आजही खासगी बस या चौकात बेकायदा थांबा बनवून प्रवासी घेऊन जाण्यासाठी उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांमुळे या चौकातील वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटेनासे झाल्याचा आरोप काही वाहनचालकांसह नागरिक करताना दिसत आहे.

ठाणे - जिल्ह्यात 12 ते 17 फेब्रुवारी दरम्यान ठिकठिकाणी वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन करत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सप्ताहाच्या कालावधीत शहरात वाहतूक कोंडी कुठेही होणार नाही. याची दक्षता घेऊन वाहतूक पोलिसांनी नियोजन केले होते. मात्र, वाहतूक शाखेचा सप्ताह संपताच पुन्हा कल्याण शहरातील सहजानंद चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. या चौकात खासगी बसेसच्या थांब्याला कल्याण वाहतूक विभाग व महापालिका प्रशासनाने 2004 सालापासून मनाई केली आहे. तरी आजही खासगी बस या चौकात बेकायदा थांबा बनवून प्रवासी घेऊन जाण्यासाठी उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांमुळे या चौकातील वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटेनासे झाल्याचा आरोप काही वाहनचालकांसह नागरिक करताना दिसत आहे.

पोलिसांचा वाहतूक सप्ताह संपताच पुन्हा 'ट्रॅफिक जॅम'

खासगी बस उभ्या केल्यास कारवाईचा मनाई फलकच गायब

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 2000 सालापासून कल्याण वहातूक शाखा, महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर 2004 मध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सदानंद चौकात खासगी बसेसच्या थांब्याला मनाई करून तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला. या खासगी बसेसला दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी थांबा देण्यात आला. दोन-चार वर्षे या चौकात बसेस उभी करणे बंद होऊन काही प्रमाणात वहातूक कोंडीची समस्या सुटली होती. मात्र, पुन्हा चौकात खासगी बसेस उभ्या राहू लागल्याने वाहतूक कोंडीने वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहे. खळबळजनक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेने हजारो रूपये खर्च करून जो खासगी बस व टेम्पो उभा करण्यास मनाई असल्याचा फलक लावण्यात आला होता. तो लोखंडी फलकच कोणीतरी गायब केला आहे.

बायपासचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत !

कल्याण शहरातील वहातूक कोंडीवर सर्वात मोठा तोडगा काढण्यासाठी दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल, असा खाडीलगत असलेल्या गोविंदवाडी बायपासचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचासाठी 2009 साली राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यावेळी ते तब्बल 18 दिवस आधारवाडी कारागृहात बंद होते. त्यानंतर 2011 मध्ये गोविंदवाडी बायपासच्या कामाला आघाडी सरकारने सुरूवात केली. मात्र, युतीचे सरकार येऊनही या बायपासचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. तरीसुद्धा या मार्गावर वाहतूक नागरिकांनी सुरू केली आहे.

वाहतूक शाखेच्या हप्तेखोरीमुळे वाहतूक कोंडी ?

कल्याण पश्चिममधील बैलबाजार ते लालचौकीपर्यंत असलेल्या मार्गावर दिवसरात्र रहदारी असते. त्यातच या मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या दुकानांच्या रांगा उभ्या राहिल्या. मात्र, याठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने दुकानात जाणारा ग्राहक वाहन रस्त्यावर सोडून दुकानात खरेदीसाठी जातात. या मार्गावर थातूरमातूर दिखाव्यासाठी कल्याण वाहतूक शाखेकडून टोईंग गाडीत दुचाक्या उचलून कारवाईत करण्यात येते. मात्र, दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांवर कारवाई करायची नाही. कारवाई केली तर ग्राहक पुन्हा दुकानात येणार नाही. त्यामुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी व दुकानदारांमध्ये आर्थिक साटेलोटे होऊन ग्राहकांच्या वाहनांना जॅमर लावण्यात येत नसल्याने या दुकानदारांकडून वाहतूक शाखेला मासिक हफ्ता बांधल्याचा खळबळजनक आरोप वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालकाने केला आहे. हीच तऱ्हा सदानंद चौकात बेकायदा उभ्या राहणाऱ्या खासगी बस चालक व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा - 'ग्राउंड रोलर'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस, वर्तकनगरातील 'झेडपी'च्या मैदानावर रंगला आठवणींचा डाव

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.